विजयदुर्ग किल्ल्याची पडझड रोखण्यासाठी तात्काळ उपाय योजना करण्यात याव्यात. अशी मागणी युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांच्याकडे केली असता ना.पटेल यांनी तातडीने  केंद्रीय पुरातत्व खात्याला दुरूस्ती खर्च तयार करण्याचे दिले आदेश दिले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विजयदुर्ग किल्ल्याय़ाची पडझड रोखण्यासाठी तात्काळ उपाय योजना करण्यात याव्यात्. यासाठी आज केंद्रीय सांस्कृतिक मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांची भेट घेतली. यावेळी दुरुस्ती करण्यासाठी लेखी पत्र सुध्दा दिले. बैठकीमध्ये  स्वराज्यात आरमाराचे व समुद्री किल्ल्याय़ांचे महत्व सांगून हा अनमोल ठेवा जतन करण्यासाठी लवकरात लवकर प्रयत्न करावेत. अशी मागणी आपण केली आहे .असे युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी केली.

श्री पटेल यांनी तातडीने  केंद्रीय पुरातत्व खात्याला  दुरूस्ती खर्च तयार करण्याचे आदेश दिले. पावसाळा संपताच पुनर्बांधणीचे काम सुरू करण्याचे आदेश देण्यात आले. तसेच आवश्यक आहेत. त्या  सर्व  कागदोपत्री परवानग्या आठवडाभरात पूर्ण झाल्या पाहिजेत. अशी सूचना सुद्धा त्यांनी केल्या.

आजची बैठक अत्यंत सकारात्मक झाली, अशी माहिती युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी दिली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Measures should be taken to prevent the collapse of vijaydurg fort yuvraj sambhaji raje abn
First published on: 07-08-2020 at 00:16 IST