अलिबाग- रायगड जिल्ह्यात पुन्हा एकदा अंमली पदार्थांचा मोठा साठा रायगड पोलिसांनी जप्त केला आहे. १७४ किलो वजनाचे  मॅफेड्रॉन पोलिसांनी जप्त केले आहे. ज्याची बाजारातील किंमत २१८  कोटी आहे. खोपोली येथील ढेकू गावात एका इलेक्ट्रिकल पोलीस बनवणाऱ्या कंपनीत बेकायदेशीरपणे एमडी पावडर तयार केली जात असल्याचे दिसून आले होते. पोलिसांनी धाड टाकून केलेल्या कारवाई ८५ किलो मॅफेड्रॉन जप्त केले होते ज्याची किंमत १०८ कोटी एवढी होती.

हेही वाचा >>> खटला निकाली काढण्यासाठी २० हजाराची लाच घेणाऱ्या सरकारी वकिलास अटक

call, electricity bills, scam,
“बील न भरल्याने वीज पुरवठा खंडित केला जात आहे”, असा फोन आला तर विश्वास ठेवू नका, फसवणूक होऊ शकते 
through online transactions, airline employee, defrauded, shil pahata area, thane
ठाणे : विमान कंपनीतील कर्मचाऱ्याची ३७ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक
nashik, malegaon, clerk arrested, ration office, Accepting Bribe, Register Needy Families, Welfare Schemes, malegaon bribe case,
नाशिक : लाच स्वीकारताना कारकुनास अटक
man molests 15 year minor girl in running local train
रेल्वेत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली असून खोपोली पोलीस ठाण्यात  एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.  आरोपींच्या चौकशी दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी होणार गावातील एका गोडाऊन वर पुन्हा कारवाई केली. १७४ किलो मॅफेड्रॉन बॅरल्समध्ये लपवून ठेवल्याचे आढळून आले. ज्याची बाजारातील किंमत २१८ कोटींच्या आसपास आहे. त्यामुळे या प्रकरणात आत्तापर्यंत ३२५.४२ कोटी रुपये किमतीचा एमडी पावडर साठा जप्त केला आहे. महत्वाची बाब म्हणजे या प्रकरणातील आरोपींनी काही अमली पदार्थ  परदेशातही पाठवण्याचे पाठविल्याचे समोर आले आहे. त्याचा तपास सुरू आहे अशी माहिती कोकणपरिक्षेत्रचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रवीण पवार यांनी खोपोलीत पत्रकार परिषदेत दिली.  यावेळी पोलीस अधीक्षक सोमनाथ घाडर्गे आणि अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे उपस्थित होते.