MHT CET Exam 2021; विद्यार्थांच्या लोकल प्रवासाचा प्रश्न कायम

सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रि या ३० सप्टेंबपर्यंत पूर्ण करणे आवश्यक आहे.

MHT CET exam from September 15
एमएचटी सीईटी परीक्षा २०२१ (प्रातिनिधिक फोटो)

अभियांत्रिकी, औषधनिर्माण शास्त्र, एमसीए, एमबीए, आर्किटेक्चर, बीएड आदी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) १५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबरदरम्यान होणार आहेत. परीक्षा केंद्रावर ऑनलाइन पद्धतीने ही परीक्षा होईल. तसेच महाविद्यालये १ नोव्हेंबरपासून सुरू होतील, अशी घोषणा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केली होती. आज १५ सप्टेंबर पासून परीक्षा सुरु होत असतांना अजूनही विद्यार्थांना परीक्षेसाठी लोकलने प्रवास करता येणार की नाही? या प्रश्नाचं उत्तर अद्याप देण्यात आलेलं नाही.

आज एमसीए, एम.एचएमसीटी, एम.आर्क, एम.पी.एड, बीए/बीएससी आणि बीएड सीईटीची परीक्षा घेण्यात येत आहेत. परीक्षेसाठी विद्यार्थांना लोकल प्रवास परवानगी द्यावी यासाठी राज्य सरकारकडून रेल्वेला पत्र पाठवले आहे असं सांगण्यात आलं आहे. मात्र रेल्वे प्रशासनाकडून अद्याप पत्र प्राप्त झालं नसल्याचं सांगण्यात आलं आहे. यामुळे विद्यार्थांनी नक्की काय करायचं हा मोठा प्रश्न उभा राहिला आहे.

किती विद्यार्थी परीक्षा देणार?

यावर्षी MHT CET 2021 परीक्षेसाठी एकूण ८ लाख ५५ हजार ८६९ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. एवढेच नाही तर कोविड -१९ साथीच्या दरम्यान परीक्षा केंद्रांची संख्या १९८ वरून २२६ करण्यात आली आहे.

परीक्षांचे वेळापत्रक

एमसीए, एम.एचएमसीटी, एम.आर्क, एम.पी.एड, बीए/बीएससी आणि बीएड  : १५ सप्टेंबर

एम.पी.एड (शारीरिक चाचणी) : १६ ते १८ सप्टेंबर

एमबीए, एमएमएस : १६ ते १८ सप्टेंबर

बीई/बीटेक, बीफार्म, डीफार्म, अ‍ॅग्रीकल्चर : २० सप्टेंबर ते १ ऑक्टोबर

बी.एचएमसीटी, एम.एड, बी.एड आणि बी.पी.एड, एलएलबी (५वर्षे) : ३ ऑक्टोबर

बीपीएड (शारीरिक चाचणी) : ४ ते ७ ऑक्टोबर

एलएलबी (३ वर्षे) : ४ आणि ५ ऑक्टोबर

बीएड (जनरल आणि स्पेशल) : ६ आणि ७ ऑक्टोबर

फाईन आर्ट (ऑफलाईन) : ९ आणि १० ऑक्टोबर

विद्यार्थीसंख्या किती?

एमसीए – २५,२०८

एमबीए, एमएमएस – १,३२,१९०

एमएचटी-सीईटी – ५,०५,७८८

एलएलबी (तीन वर्षे) – ६८,८७५

एलएलबी (पाच वर्षे) – २४,९७२

बीएड (सर्व) – ७५,७१७

लवकरात लवकर प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून १ नोव्हेंबपर्यंत महाविद्यालये सुरू करण्यात येतील, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Mht cet exam started from september 15 mumbai local travel status for students state government and railway ttg