सैनिक शाळा सातारा येथील सन 2020-21 च्या सत्रातील सहावी आणि नववीसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली असून प्रवेशासाठी ठराविक नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. यासाठी 23 सप्टेंबर 2019 पर्यंत ऑनलाईन अर्ज भरायचे आहेत. या प्रवेशांसाठी पाच जानेवारी 2020 रोजी प्रवेश परीक्षा होणार आहे. सैनिक शाळा सातारा संरक्षण मंत्रालय आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त अधिपत्याखाली 1961 साली स्थापन झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ऑनलाईन अर्ज भण्यासाठी http://www.sainiksatara.org या संकेतस्थळाला भेट द्यावी. ऑनलाईन अर्ज भरताना आवश्यक त्या रकमेचा डिमांड ड्राफ्ट आपल्यासोबत ठेवावा. ऑनलाईनवर पूर्णपणे भरलेल्या प्रवेश अर्जाची प्रिन्टेड प्रत व डिमांड ड्राफ्ट आणि सोबतची जोडपत्रे सैनिक शाळा साताराच्या कार्यालयात पोहोचवण्याची अंतिम तारीख 23 सप्टेंबर 2019 रोजी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत असेल. सामान्य वर्ग (जनरल), संरक्षण दलातील आजी/माजी कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी 400 रुपये तर अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या वर्गातील मुलांसाठी 250 रुपये ऑनलाईन नोंदणी शुल्क आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Military school satara admission open online nck
First published on: 22-08-2019 at 17:12 IST