scorecardresearch

Premium

सांगली : औदुंबरमध्ये मिनीबस आगीत खाक

औदुंबर या तीर्थस्थानी मध्यरात्री अचानक लागलेल्या आगीत मिनी बस जळून खाक होण्याचा प्रकार घडला. नाशिकहून आलेल्या या बसला मंगळवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास आग लागली.

Minibus fire in Audumber
सांगली : औदुंबरमध्ये मिनीबस आगीत खाक (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

सांगली : औदुंबर या तीर्थस्थानी मध्यरात्री अचानक लागलेल्या आगीत मिनी बस जळून खाक होण्याचा प्रकार घडला. नाशिकहून आलेल्या या बसला मंगळवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास आग लागली. सुदैवाने या घटनेत कोणालाही इजा झाली नाही.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, सोमवारी रोजी रात्री श्री क्षेत्र औदुंबर येथे नाशिकहून आलेली मिनी बस (एम एच ५ ए झेड ५५८३) स्वयंभू गणपती जवळील चिंचेच्या झाडाखाली लावण्यात आली होती. रात्री चालक गाडीमध्ये झोपला असताना अचानक एक ते दोन वाजण्याच्या दरम्यान बसच्या पुढील बाजूस आग लागली. क्षणार्धात ही आग वाढत गेली. आग लागल्याची जाणीव होताच चालक जागा झाला व खाली उतरून स्थानिक लोकांना जागे करून, याची माहिती दिली. आग विझवण्याचे प्रयत्न सुरू होईपर्यंत आगीने संपूर्ण बसला वेढले होते.

वसई : मत्स्य दुष्काळामुळे बोटी बंद ठेवण्याची वेळ, बंदीनंतर काही बोटी रवाना
Nandurbar, food poison, eating Bhandara food, ranala village, 150 people poisoned, marathi news,
नंदुरबार : भंडाऱ्याचा प्रसाद खाल्ल्यानंतर १५० पेक्षा जास्त जणांना विषबाधा
Controversy in Ambad
अतिक्रमित प्रार्थनास्थळ हटवल्याने अंबडमध्ये वाद
Malad
माणुसकीला काळिमा! मुंबईत गटारात फेकलेल्या गोणीत सापडलं नवजात बालक, प्राणीप्रेमीच्या ‘या’ कृतीमुळे मिळालं जीवदान

हेही वाचा – “मंत्रीपदासाठी आता देवाला कौल लावायचाच बाकी राहिलाय”, कोण म्हणतंय जाणून घ्या

हेही वाचा – देवेंद्र फडणवीसांचं महत्त्वाचं विधान, “पंकजा आणि धनंजय मुंडेंना एकच विनंती आहे की, तुम्ही दोघं…”

गाडीचे पुढील टायर या आगीमध्ये फुटले असून, गाडीतील बैठक व्यवस्था व कागदपत्रेही जळून खाक झाली होती. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सदर आग ही गाडीतील शॉर्टसर्किटमुळे लागली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या परिसरामध्ये मिठाई, खेळणी, हॉटेल अशा विविध व्यवसायांच्या टपर्‍या असून, सुदैवाने यांना कोणत्याही प्रकारची हानी झाली नाही. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Minibus catches fire in audumber ssb

First published on: 05-12-2023 at 18:14 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×