scorecardresearch

Premium

“मंत्रीपदासाठी आता देवाला कौल लावायचाच बाकी राहिलाय”, कोण म्हणतंय जाणून घ्या

सगळे प्रयत्न करून दमलो, आता देवाला कौल लावून विचारायचे राहिले आहे. काय अडचण आहे ते बघावे लागेल, मानपान राहिला असेल तर तोही करावा लागेल, असे वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे पक्ष प्रतोद आमदार भरत गोगावले यांनी केले.

bharat gogawale
रायगड : मंत्रीपदासाठी आता देवाला कौल लावायचाच बाकी राहिलाय, कोण म्हणतंय जाणून घ्या (छायाचित्र – लोकसत्ता टीम/ग्राफिक्स)

अलिबाग- सगळे प्रयत्न करून दमलो, आता देवाला कौल लावून विचारायचे राहिले आहे. काय अडचण आहे ते बघावे लागेल, मानपान राहिला असेल तर तोही करावा लागेल, असे वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे पक्ष प्रतोद आमदार भरत गोगावले यांनी केले. ते महाड येथे पत्रकारांशी बोलत होते. मला अजूनही मंत्रीपदाची आशा असून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी त्यात लक्ष घालावे अशी विनंती त्यांनी केली.

दोन दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यात एका कार्यक्रमादरम्यान गोगावले यांनी माझ्या मंत्रीपदासाठी आता महादेवालाच साकडे घाला असे आवाहन गावकऱ्यांना केले होते. त्यामुळे मंत्रीपदापासून वंचित राहिल्याची सल गोगावले यांना बोचत असल्याचे सातत्याने दिसून येत आहे.

Narendra Modi and Rahul Gandhi
“वाराणसीत तरुणांना नशेत नाचताना पाहिलं”, राहुल गांधीच्या टीकेवर मोदींचा पलटवार; म्हणाले, “जे स्वतः…”
Eknath SHinde uddhav Thackeray (3)
“मनोहर जोशींचं घर जाळण्यासाठी…”, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; म्हणाले, “पंतांना भर सभेत…”
What Baba Sidique Said?
“..म्हणून काँग्रेस पक्ष सोडला”, बाबा सिद्दीकींनी सांगितलं कारण; अजित पवारांसह जाणार का? या प्रश्नाचंही दिलं उत्तर
modi in rajyasabha
“मला कोणतेही आरक्षण आवडत नाही”; पंतप्रधान मोदींनी राज्यसभेत वाचलेल्या नेहरूंच्या ‘त्या’ पत्रात काय लिहिले आहे?

हेही वाचा – “उद्धव ठाकरे किती रडारड करणार?” ‘त्या’ मागणीवरून भाजपाला टोला

राज्यात शिवसेना भाजप सरकार स्थापनेनंतर मंत्रीमंडळात स्थान मिळेल अशी अपेक्षा आमदार भरत गोगावले यांना होती. मात्र आयत्यावेळी दुसऱ्यांना संधी देण्यासाठी त्यांना थांबावे लागले. पक्षासाठी त्याग केल्याचे सांगत गोगावले यांनी त्यावेळी सांगितले. तेव्हापासून मंत्रीपदाची वाट पाहणारे गोगावले आजूनही प्रतीक्षा यादीवर राहिले आहेत.

मंत्रीमंडळाच्या दुसऱ्या विस्तारात गोगावले यांना संधी मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीच्या सत्तेत सहभागी झाली, त्यांना नऊ मंत्रीपदे दिली गेली. त्यामुळे शिवसेनेचे गोगावले पुन्हा एकदा वेटींग लिस्टवर राहिले. आधी नवरात्रीत आणि नंतर दिवाळी मंत्रीमंडळाचा विस्तार होईल असे त्यांना सांगितले गेले. पण मंत्रीमंडळ विस्तार झाला नाही. आता विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रीमंडळाचा विस्तार होईल अशा चर्चा होत्या. मात्र तशा हालचाली दिसून येत नाही. त्यामुळे गोगावले नाराज आहेत. ही नाराजी त्यांनी कधी लपवलेली नाही.

हेही वाचा – ‘वॉक टू वर्क’ला प्रोत्साहन देणारे नवे गृहनिर्माण धोरण लवकरच! वयोवृद्ध, विद्यार्थ्यांसाठीही विशेष गृहयोजना!

मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार हे मला माहीत नाही. मी माझे काम करत राहणार, लोकांचे प्रश्न सोडवत राहणार असे गोगावले यांनी म्हटले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Now all that is left is to ask god for the post of minister statement by bharat gogawale ssb

First published on: 05-12-2023 at 16:24 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×