राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदारांसह शिवसेनेत बंड करत राज्यात सरकार स्थापन केलं. त्यानंतर शिंदे गटातील आमदारांवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरेंकडून सातत्याने गद्दार म्हणत हल्लाबोल सुरु आहे. त्यावरून आता मंत्री गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर तोफ डागली आहे.

“उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे हे आम्हाला गद्दार म्हणत आहेत. बाळासाहेबांचा फोटो लावण्याचा मला अधिकार नाही, असेही म्हणत आहेत. मात्र, तुम्ही बाळासाहेब यांच्या संपत्तीचे वारसदार आहात. आम्ही हिंदुत्वाचे आणि त्यांच्या विचारांचे वारसदार आहोत,” असे गुलाबराव पाटील यांनी म्हटलं.

हेही वाचा – “पत्नीला वाईट वागणूक देणाऱ्या धनंजय मुंडेंना नातं…”; पंकजा मुंडेंवरील ‘त्या’ वक्तव्यावरून प्रकाश महाजनांची टीका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“सायकलवर फिरून आम्ही शिवसेना मोठी केली. शंभरपेक्षा अधिक गुन्हे आमच्यावर दाखल आहेत. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर एकही गुन्हा दाखल नाही. आदित्य ठाकरे यांचे वय 32 आणि माझं शिवसेनेतील वय 35 आहे,” अशा शब्दांत गुलाबराव पाटील यांनी आदित्य ठाकरेंवरही निशाणा साधला आहे.