राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी नागपूरमधील भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ( आरएसएस ) वैचारिक बैठकीबाबतचं एक ट्विट केलं होतं. “महाराष्ट्रात भाजपा एकटीच लढेल. ज्यांना भाजपाबरोबर निवडणूक लढवायची आहे, त्यांनी कमळावर निवडणूक लढवावी,” असं भाजपा आणि आरएसएसच्या बैठकीत ठरल्याचा दावा करत जितेंद्र आव्हाडांनी शिंदे आणि अजित पवार गटाला सूचक इशारा दिला होता. यावरून आता मंत्री हसन मुश्रीफांनी एकेरी उल्लेख करत आव्हाडांवर टीका केली आहे.

जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?

“नागपूरमधील हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर धक्कादायक राजकीय चर्चा सुरू झाली आहे. नागपूरमध्ये भाजपा-आरएसएस यांची एक वैचारिक बैठक झाली. त्यामध्ये तीन राज्यातील निवडणुका जिंकल्यानंतर महाराष्ट्रात काय असू शकते, यावर मंथन झाले. या मंथनातून राज्यात भाजपाने एकट्याने निवडणूक लढवावी, असे ठरवण्यात आले. ज्यांच्यावर आरोप आहेत; ज्यांच्यावर डाग आहेत. त्यांना बरोबर घेऊ नये, असे ठरविण्यात आले. ज्यांना राजकारण समजते; ज्यांना राजकीय जाण आहे. त्यांना लगेच समजले असेल की, महाराष्ट्रात भाजपा एकटीच लढेल. ज्यांना भाजपबरोबर निवडणूक लढवायची आहे, त्यांनी कमळावर निवडणूक लढवावी. महाराष्ट्रात पुढे काय होईल, हे सांगता येत नाही,” असं आव्हाडांनी ‘एक्स’ अकाउंटवर म्हटलं.

हेही वाचा : खासदार सुप्रिया सुळेंच्या निलंबनावर अजित पवारांचं परखड भाष्य; म्हणाले, “कुठल्या तरी नियमाचा…”

“आव्हाड एकाकी पडलेले आहेत”

यावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना हसन मुश्रीफ म्हणाले, “सगळं यालाच कळतं का? आव्हाड एकाकी पडलेले आहेत. पक्षात कुणीच विचारत नसल्यानं थोटे भ्रमिष्ट अवस्थेत आहेत.”

हेही वाचा : पंतप्रधानांनी अजित पवारांवर केलेल्या भ्रष्टाचारांच्या आरोपांवर जयंत पाटलांचं थेट विधान; म्हणाले, “ज्यांनी आरोप केले, त्यांनी…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“…म्हणून आम्ही अजित पवारांबरोबर जाण्याचा निर्णय घेतला”

“एकनाथ शिंदे गुवाहाटीला गेल्यानंतर भाजपाबरोबर सत्तेत जाण्यासाठी जितेंद्र आव्हाडांनी पुढाकार घेतला होता. ५३ आमदारांमध्ये सर्वात पहिली सही जितेंद्र आव्हाडांची आहे. भाजपाबरोबर जाण्यासाठी वरिष्ठांनी अनेकदा निर्णय घेतले होते. पण, अजित पवार एकाकी पडू नये म्हणून आम्ही अजित पवारांबरोबर जाण्याचा निर्णय घेतला,” असं हसन मुश्रीफांनी सांगितलं.