राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडलं, आणि उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झालं. त्यामुळे आगामी सर्व निवडणुका शिंदे गट आणि भाजपा युतीत लढेल, असं अनेकवेळा दोन्ही पक्षातील नेत्यांनी सांगितलं. त्यात आता शिंदे गटातील मंत्री अब्दुल सत्तार यांनी “माझ्या मतदारसंघात भाजपाशी युती नको,” असं मोठं विधान केलं आहे.

अब्दुल सत्तार म्हणाले, “माझ्या मतदारसंघात भाजपाशी युती नको. या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत व्हावी. माझ्याच नाही, तर ज्या ज्या मतदारसंघात माझ्या मतदारसंघाप्रमाणे परिस्थिती असेल त्या त्या मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढती करण्यावर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी विचार करावा. शेवटी निवडून आल्यावर सत्ता स्थापन करताना आपण सोबत राहू.”

हेही वाचा – “उदयनराजेंना विरोध करुन मोठा झालो”, मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर अभिजीत बिचुकलेंची प्रतिक्रिया; म्हणाले…

“जमलं तर भाई भाई, नाहीतर कुस्ती”

यावरुन केंद्रीय मंत्री रावसाहबे दानवे यांनी अब्दुल सत्तारांना टोला लगावला आहे. “आगामी निवडणुकीत आम्ही आमची ताकद दाखवू. त्यानंतर आम्ही एकत्र येत जिल्हापरिषद ताब्यात घेवू. जमलं तर भाई भाई, नाहीतर कुस्ती,” असे प्रत्युत्तर रावसाहेब दानवेंनी दिलं आहे.

हेही वाचा – “सचिन वाझे हे उद्धव ठाकरेंचे कार्यकर्ते” ऑन रेकॉर्डचा उल्लेख करत आशिष शेलारांचा दावा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“दोघांमध्ये मैत्रीपूर्ण लढत झाली पाहिजे”

“दिल्लीत आणि मुंबईतसह जिल्ह्यात, महापालिकेत, जिल्हा परिषदेत सोबत राहू. स्थानिक पातळीवर एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भाजपा असे दोघेच आहोत. त्यामुळे या दोघांमध्ये मैत्रीपूर्ण लढत झाली पाहिजे. जो निवडून येईल तो सत्ताधाऱ्यांचा म्हणजे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचाच कार्यकर्ता असेल,” असेही अब्दुल सत्तार यांनी म्हणाले होते.