एकनाथ शिंदे दादरमध्ये प्रति शिवसेना भवन बांधणार असल्याची चर्चा सुरु आहे. याबाबत मंत्री उदय सामंत (uday samant) यांनी ट्वीट केले आहे. प्रति शिवसेना भवन नाही तर, जनसंपर्कासाठी कार्यालय बांधत असल्याचे स्पष्टीकरण सामंतांनी दिले आहे.

“प्रति सेनाभवन नव्हे तर जनसंपर्कासाठी कार्यालय बांधतोय, शिवसेना भवनाबद्दल आदर कायम आहे”, असं उदय सामंत म्हणाले आहेत. “मुंबई दादर येथे प्रति शिवसेना भवन मा. एकनाथजी शिंदे करत आहेत, हा गैरसमज पसरवला जात आहे. मा. मुख्यमंत्री महोदयांना सर्वसामान्य जनतेला भेटता याव ह्यासाठी मध्यवर्ती कार्यालय असावे आमचा प्रयत्न आहे. शिवसेना भवनबद्दल आम्हाला कालही आदर होता उद्याही राहील”, असं ट्विट उदय सामंत यांनी केलं आहे.

हेही वाचा- ‘प्रती शिवसेनाभवना’वर राष्ट्रवादीची प्रतिक्रिया, “शिंदे गटाची ताकद…” म्हणत जयंत पाटलांनी लगावला टोला

दादरमध्ये शिंदे गटाकडून प्रती सेनाभवन उभारण्यात येणार असल्याची माहिती आमदार सदा सरवणकर यांनी दिली. यासाठी दादरमध्ये जागेचा शोधही घेण्यात येत आहे. दादरमध्ये शिंदे गटाचे मुख्य कार्यालय उभारण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: या कार्यालयातून जनतेच्या समस्या जाणून घेणार आहेत. मुंबईतील प्रत्येक प्रभागामध्ये या प्रतिसेना भवनाचे कार्यालय असेल. येत्या १५ दिवसांमध्ये या कार्यालयाचे उद्धाटन करण्यात येणार असून मुंबई शहरातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आले असल्याचे सरवणकर म्हणाले.

हेही वाचा- बंड करताना थोडाजरी दगा फटका झाला असता तर…; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आम्ही अद्याप शिवसेनेतूनच आहोत. शिवसेनेतून बाहेर पडलो नाहीत. मुंबई शहरातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी कार्यालय उभारण्यात येणार असल्याचे सरवणकर म्हणाले. तसेच मुंबईतील प्रत्येक प्रभागात अशा प्रकारची कार्यालय उभारण्यात येणार असून दादरमध्ये उभारण्यात येणारे कार्यालय मुख्य असल्याचेही सरवणकर म्हणाले.