वाई : किसन वीर सातारा सहकारी कारखान्याच्या अध्यक्षपदी आमदार मकरंद लक्ष्मणराव जाधव पाटील यांची तर उपाध्यक्षपदी प्रमोद भानुदास शिंदे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. अध्यक्ष-उपाध्यक्षाची निवड करण्यासाठी आज नवनिर्वाचित संचालक मंडळाची बैठक झाली. या वेळी अध्यक्षपदासाठी आमदार मकरंद पाटील व उपाध्यक्षपदासाठी प्रमोद शिंदे यांचा एक एकच अर्ज आल्याने त्यांची निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी मनोहर माळी यांनी जाहीर केले.

त्यानंतर सातारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितिन पाटील व सूतगिरणीचे अध्यक्ष शशिकांत पिसाळ यांनी व सर्व संचालकांनी त्यांचा सत्कार केला. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत किसन वीर कारखाना बचाव शेतकरी पॅनेलने सर्व २१ जागा जिंकल्या आहेत. या निवडीनंतर  फटाके फोडत आणि ढोल-ताशांचा गजर करण्यात आला. प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे सौरभ शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनीही आज आमदार मकरंद पाटील प्रमोद शिंदे व नितीन पाटील यांचा सत्कार केला व भेट घेतली.

Udayanraje Bhosle filled the nomination form in a show of strength
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन करत उदयनराजेंनी भरला उमेदवारी अर्ज
nashik, Congress, Shirish Kotwal as Nashik District President, Nashik District congress President, Displeasure of local bearers, Shobha Bachhav Nomination in Dhule, dhule lok sabha seat,
काँग्रेस नाशिक प्रभारी जिल्हाध्यक्षपदी शिरीष कोतवाल
Assembly Speaker Rahul Narvekars letter to Chief Minister to Change the name of Alibaug
अलिबागचे नाव बदला, विधानसभा अध्यक्षांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Former District Congress President Prakash Devtale joins BJP
जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रकाश देवतळे यांचा भाजपमध्ये प्रवेश

अपेक्षांचे ओझे

आमदार मकरंद पाटील यांच्याकडे किसन वीरची सत्ता आली असून त्यापूर्वी खंडाळा कारखान्याची सत्ता मिळाली होती. प्रतापगड सहकारी भाडे तत्त्वावर किसन वीरकडे आहे. पंधरा लाख टन उसाची नोंद असलेले हे तिन्ही कारखाने या वर्षी आर्थिक अडचणीमुळे बंद राहिले. यामुळे या कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील आजही वीस हजार टन तोडणीच्या प्रतीक्षेत उभा आहे. हा ऊस घालविण्याचे आव्हान मोठे आहे . याशिवाय त्यांना या कारखान्यावरील कर्जाचे ओझे हलके करून कारखाने सुरू करून शेतकऱ्यांना व कामगारांना दिलेला शब्द पाळावा लागणार आहे.