वर्ध्याचे आमदार डॉ. पंकज भोयर यांनी शनिवारी रात्री आर्वी नाका परिसरातील जुगार अड्ड्यावर धाड टाकून पोलखोल केल्याने पोलिसांची तारांबळ उडाली. शनिवारी रात्री राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चौकात हायमास्ट लॅम्पचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रम आटोपताच परिसरातील नागरिकांनी आमदार पंकज भोयर यांच्याकडे जुगार, सट्टा अड्ड्याची माहिती दिली आणि त्या ठिकाणी धाड टाकून बेकायदेशीर धंद्याची पाहणी करण्याची विनंती केली.

महिलांनी अवैध दारू व्यवसायाची तक्रार केल्यावर आमदार भोयर तसेच भाजपा जिल्हाध्यक्ष सुनील गफाट,युवा मोर्चाचे वरुण पाठक व अन्य व्यापारी संकुलातील वरच्या माळ्यावर धडकले. तिथले दृश्य पाहताच सर्व अवाक झाले. या परिसरात सरसकट जुगार सुरु होता.

 त्याबाबत आमदार भोयर यांनी रामनगर पोलीस ठाण्याचे ठाणेदार चांदेवार यांना जाब विचारला. यावर पोलिसांनी याबाबत माहिती नसल्याचे उत्तर दिल्यावर आमदार भोयर यांनी चांगलेच खडसावले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अनेक वर्षांपासून हा अड्डा सुरू असल्याचे महिलांनी सांगत यामुळे अनेक कुटुंब उध्वस्त होत असल्याची तक्रार केली. दरम्यान या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे.