श्रद्धा वालकर हत्याकांडनंतर देशात खळबळ उडाली आहे. तिचा प्रियकर आफताब पूनवालाने श्रद्धाचा गळा दाबून खून केल्यानंतर तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करुन फ्रीजमध्ये ठेवले होते. तसेच हे तुकडे एक एक करत दिल्लीतील मेहरोली परिसरात असलेल्या जंगलात फेकण्यात आले होते. दरम्यान, श्रध्दाच्या वडिलांनी या खूनामागे ‘लव्ह जिहाद’ची शंका व्यक्त केल्यानंतर अनेक राजकीय नेत्यांकडून या प्रकरणाचा तपास करण्याची मागणी करण्यात येत आहे. बडनेराचे आमदार रवी राणा यांनी याप्रकरणी ‘लव्ह जिहाद’ची शंका व्यक्त केली असून उत्तर प्रदेशप्रमाणेच महाराष्ट्रातही असा ‘लव्ह जिहाद’ विरोधी कायदा आणावा, अशी मागणी राणा यांनी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – संतापजनक! श्रद्धाच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करण्यासाठी आफताबला लागले १० तास; नंतर जेवण मागवले, बिअर प्यायला अन्…

काय म्हणाले रवी राणा?

“श्रद्धाचा खून अत्यंत क्रूरपणे करण्यात आली. तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करणं, ते फ्रिजमध्ये ठेवणं आणि रोज एक एक जंगलात नेऊन फेकणं, हे सर्व धक्कादायक आहे. श्रद्धावर अत्यंत विक्रृतपणे अत्याचार करण्यात आले आहे. या घटनेचा मी निषेध करतो”, अशी प्रतिक्रिया रवी राणा यांनी दिली आहे.

हेही वाचा – Shraddha Murder Case: ‘ते’ ३०० रुपयांचं पाण्याचं बील ठरणार महत्त्वाचा पुरावा; आफताबविरोधात पोलीस पुरावा म्हणून वापरणार

“श्रद्धाची हत्या करणाऱ्या आरोपीला थेट फाशीची शिक्षा दिली पाहिजे. ज्याप्रकारे उत्तर प्रदेशमध्ये लव्ह जिहादसाठी कायदा बनवण्यात आला आहे. त्या कायद्याच्या अंमलबजावणी महाराष्ट्रात केली पाहिजे”, अशी मागणीही रवी राणा यांनी केली आहे. तसेच हा मुद्दा मी येणाऱ्या विधानसभा अधिवेशनात करणार असल्याचेही ते म्हणाले.

हेही वाचा – Shraddha Murder Case: आफताबचं सत्य जगासमोर येणार, कोर्टानं दिली नार्को टेस्टची परवानगी!

नेमकं काय आहे प्रकरण?

वसईतील श्रद्धा वालकर या तरुणांची तिचा प्रियकर आफताबने १८ मे रोजी गळा आवळून हत्या केली होती. तसेच तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करून एक एक करत दिल्लीतील मेहरोली परिसरात असलेल्या जंगलात फेकले होते. आफताब आणि श्रद्धा हे दोघेही २०१८ पासून रिलेशनशिपमध्ये होते. श्रद्धाच्या घरच्यांना आफताबसह असलेले तिचे संबंध मान्य नसल्यामुळे त्यांनी २०१९मध्ये त्यांनी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहायला सुरुवात केली होती. दरम्यान, काही दिवसांपासून ती सोशल मीडियावर सक्रिय नसल्याने श्रद्धाचे वडील विकास वालकर यांनी ६ ऑक्टोबर रोजी पोलीस स्थानकामध्ये तत्कार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी आफताबला २६ ऑक्टोबर रोजी चौकशीसाठी बोलवले. त्यावेळी त्याने श्रद्धा २२ मे रोजी घर सोडून गेल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र आफताबने त्यापूर्वीच म्हणजेच १८ मे रोजी श्रद्धाची हत्या केली होती. हे नंतर स्पष्ट झालं. दिल्लीमध्ये राहण्यासाठी आल्यानंतर श्रद्धाने लग्नाचा तगादा लावल्याने आफताबने तिचा खून केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mla ravi rana demand law on love jihad after shradha walkar murder case spb
First published on: 17-11-2022 at 19:52 IST