रोहित पवारांच्या ‘त्या’ फोनची कोल्हापूरमध्ये चर्चा

आमदार रोहित पवार यांच्या संवेदनशीलतेची आणि तत्परतेची चुणूक कोल्हापूरकरांना पाहायला मिळाली.

MLA Rohit Pawar has given financial help to a woman from Kolhapur

कुटुंबातील व्यक्ती आजारी असून पैसे नसल्याने पुढचे उपचार कसे करायचे, गरिबानं कुठं जायचं असा सवाल कोल्हापूरातल्या एका महिलेने आमदार रोहित पवार यांना केला होता. त्यानंतर रोहित पवार यांनी या महिलेला मदत केली आहे. रोहित पवार यांच्या या कृतीची आता संपूर्ण कोल्हापूरात चर्चा होत आहे.

अतिवृष्टीमुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रावर ओढावलेली महापूराची भीषण परिस्थितीमुळे अनेकजण अद्याप त्यातून सावरलेले नाहीत. त्यामुळे अनेक स्तरांमधून अतिवृष्टीचा फटका बसलेल्या ठिकाणी मदत पोहोचवली जात आहे. यामध्ये अनेक राजकारणी, नेते मंडळीही पुढे आहेत. कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार हे देखील मदतीसाठी पूरग्रस्त भागात आहेत. दरम्यान, नेहमीच लोकांमध्ये असणाऱ्या आमदार रोहित पवार यांच्या संवेदनशीलतेची आणि तत्परतेची चुणूक कोल्हापूरकरांना पाहायला मिळाली.

आमदार रोहित पवार कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागातील नागरिकांच्या भेटीसाठी गेले असता त्यांच्यासमोर तिथल्या आर्थिक अडचणीत असलेल्या एका महिलेने ‘कुटुंबातील व्यक्ती आजारी असून पैसे नसल्याने पुढचे उपचार कसे करायचे, गरिबानं कुठं जायचं? अशी व्यथा मांडली. आमदार रोहित पवार यांनी तात्काळ संबंधित हॉस्पिटलच्या अधिकाऱ्यांना फोन करून त्या रुग्णाचे मोफत उपचाराची सोय करून दिली. रोहित पवार यांच्या या कार्यतत्परतेमुळे सर्वसामन्यांच्या समस्या सोडविणाऱ्या त्यांचे कौतुक केलं जात आहे. आमदार रोहित पवार यांनी दाखवलेल्या संवेदनशीलतेमुळे पूरस्थितीने बाधित असलेल्या एका महिलेचे आर्थिक संकट दूर झाले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Mla rohit pawar has given financial help to a woman from kolhapur abn

Next Story
नाकर्त्यां लोकप्रतिनिधींमुळे पूरग्रस्त अन्नछत्रात!
ताज्या बातम्या