वाढत्या महागाईविरोधात विविध प्रकारांमधून विरोधी पक्ष सत्ताधाऱयांवर ताशेरे ओढत असतात. आंदोलनांच्या माध्यमातून सरकारची कोंडी करण्याचा ते प्रयत्न करतात. त्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सिन्नर तालुका अध्यक्षांनी तर चक्क पोलिसांकडेच चोरी करण्याची परवानगी मागितली आहे.
या पत्रात मनसेचे सिन्नर तालुका अध्यक्ष जयंत आव्हाड सत्ताधारी संवेदनाहिन झाल्याची टीका करतात. दिवसेंदिवस दैनंदिन निकडीच्या वस्तूंच्या किंमती वाढत असल्यामुळे सामन्यांना महागाई विरोधात लढण्यासाठी चोरी करणे हाच पर्याय सत्ताधाऱयांनी ठेवला असल्याचे जयंत आव्हाड यांनी पत्रामध्ये म्हटले आहे. पोलिसांनी आता सामान्य नागरिकांना चोरी करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करून त्यांनी सत्ताधाऱयांवर उपरोधिक टीका केली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 7th Jan 2014 रोजी प्रकाशित
…आणि ‘मनसे’ने चक्क पोलिसांकडेच मागितली चोरीची परवानगी!
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सिन्नर तालुका अध्यक्षांनी तर चक्क पोलिसांकडेच चोरी करण्याची परवानगी मागितली आहे.

First published on: 07-01-2014 at 01:42 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns asked permission from police to steal