महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आठ दिवसांच्या कोल्हापूर आणि कोकण दौऱ्यावर जाणार आहेत. याबाबत मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवर याची घोषणा करत माहिती देण्यात आली आहे. यानुसार राज ठाकरे २९ नोव्हेंबरला आपल्या दौऱ्याला सुरुवात करतील. हा दौरा ६ डिसेंबरपर्यंत चालेल.

मनसेने आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं, “२९ नोव्हेंबर २०२२ ते ६ डिसेंबर २०२२ या दरम्यान राज ठाकरे कोल्हापूर आणि कोकण दौऱ्यावर येत आहेत.”

Sharad pawar reply on Praful patel statement
‘शरद पवार भाजपाबरोबर जाण्यास ५० टक्के तयार होते’, प्रफुल पटेलांच्या दाव्यावर शरद पवारांचे प्रत्युत्तर
Kolhapur Police arrest gang selling fake notes
बनावट नोटांची छपाई, विक्री करणारी टोळी कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात; म्होरक्याचे नेत्यांशी लागेबांधे असल्याची चर्चा
Kolhapur Lok Sabha, Hasan Mushrif
कोल्हापूरच्या आखाड्यात हेलिकॉप्टरवरून जुंपली
Raj Thackerey teaser
VIDEO : राज ठाकरे- अमित शाह यांच्या बैठकीत काय ठरलं? शिवतीर्थवरून मिळणार उत्तर, पाहा पाडवा मेळाव्याचा टीझर!

राज ठाकरे कधी कुठे जाणार?

राज ठाकरेंच्या दौऱ्याला मंगळवारी (२९ नोव्हेंबर) सुरुवात होईल. ते सर्वात आधी मुंबईहून कोल्हापूरला रवाना होतील. त्यानंतर ते तेथून सावंतवाडीला जातील. २९ नोव्हेंबरला त्यांचा मुक्काम कुडाळ येथे असणार आहे. राज ठाकरेंचा हा दौरा ६ डिसेंबरला दिपोलीत संपणार आहे.

हेही वाचा : राज ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कौतुक केलेल्या चित्रपटाला संभाजीराजेंचा विरोध, म्हणाले, “त्यांना माझी…”

एकूणच मनसेच्या या घोषणेवरून राज ठाकरे पक्ष बांधणीच्या कामासाठी सक्रीय झाल्याचं दिसत आहे. त्यामुळे या दौऱ्यामुळे मनसेला आगामी निवडणुकांमध्ये किती फायदा होतो हे येणाऱ्या काळातच पाहायला मिळेल.