२००९ मध्ये नाशिक येथील औद्योगिक कारखान्यांमध्ये परप्रांतीयांऐवजी मराठी उमेदवारांनाच नोकरी देण्याचे फर्मान काढल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेले मनसेचे प्रदेश सरचिटणीस अतुल चांडक यांना तब्बल पाच वर्षांनंतर बुधवारी रात्री पोलिसांनी अटक केली.रात्री ९ च्या सुमारास सातपूर पोलिसांनी चांडक यांना ताब्यात घेतले. २००९ मध्ये मनसेने परप्रांतीयांविरोधात मोठय़ा प्रमाणावर आंदोलन सुरू केले होते. नाशिक येथील अंबड व सातपूर येथील औद्योगिक कारखान्यांमध्ये परप्रांतीयांऐवजी स्थानिक मराठी उमेदवारांनाच संधी देण्यात यावी, असे पत्रक मनसे नेत्यांनी उद्योजकांना दिले होते.त्याप्रकरणी चांडक यांच्यासह मनसेच्या नेत्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.
संग्रहित लेख, दिनांक 16th Jan 2014 रोजी प्रकाशित
मनसेचे नेते अतुल चांडक यांना अटक
२००९ मध्ये नाशिक येथील औद्योगिक कारखान्यांमध्ये परप्रांतीयांऐवजी मराठी उमेदवारांनाच नोकरी देण्याचे फर्मान काढल्याप्रकरणी गुन्हा दाखल
First published on: 16-01-2014 at 02:35 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns leader atul chandak arrested