मास्क लावले त्यांना करोना झाला नाही असं आहे का? अशी विचारणा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. जर घरातच राहायचं आहे तर तोंडाला पट्टी का बांधावी? असाही प्रश्न त्यांनी विचारला आहे. मला तिरस्कार नाही पण गुदरमल्यासारखं होतं असं सांगत यावेळी त्यांनी आपली भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्राच्या राजकारणाचा भविष्यवेध घेण्याच्या निमित्ताने ‘लोकसत्ता’कडून आयोजित ‘दृष्टी’ आणि ‘कोन’ या दूर-संवादमालिकेत ते बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

माझं तोंड आणि सहकाऱ्यांचे हात याच कॉम्बिनेशनवर सगळा पक्ष – राज ठाकरे
‘तुम्ही मास्क घातलं नाही’, असं पत्रकाराने राज ठाकरेंना म्हणताच…

मास्क घालण्याला तुमचा विरोध आहे का? असं विचारलं असता ते म्हणाले की, “जर घरातच राहायचं आहे तर तोंडाला पट्टी का बांधावी? बाहेर कुठे फिरणं नसताना मास्क लावून काय करायचं? ज्यांनी मास्क लावले त्यांना करोना झाला नाही असं म्हणणं आहे का? मी मास्क लावला काय आणि नाही लावला काय”.

पुढे ते म्हणाले की, “मध्यंतरी मला हाताच्या आणि पायाच्या ऑपरेशनसाठी रुग्णालयात जावं लागलं तेव्हा मास्क लावला होता. मला तिरस्कार नाही पण गुदरमल्यासारखं होतं. शिवाजी पार्कात मी पाहिलं तर अनेक लोक मास्क लावून धावत होते. मी म्हटलं एक तर धावू नका किंवा मास्क लावू नका. कुठेतरी बेशुद्ध होऊन पडाल. त्यामुळे मास्क लावण्यास माझा विरोध आहे असं काही नाही”.

“धडा न घेता आपण निवडणुका, कुंभमेळा, राजकारणात गुंतलो”; राज ठाकरेंनी व्यक्त केला संताप

मनसे आहे म्हणून राज ठाकरे आहे
राज ठाकरे आणि मनसे याची तुलना केल्यास विसंवादी दिसते असं विचारण्यात आलं असता राज ठाकरेंनी सांगितलं की, “मनसे आहे म्हणून राज ठाकरे आहे. माझं तोंड आणि सहकाऱ्यांचे हात याच कॉम्बिनेशनवरती सगळा पक्ष असतो. कदाचित कडवट बोलण्यामुळे मी लक्षात राहत असेन आणि माझे सहकारी यांच्या हातवाऱ्यांमुळे लक्षात राहत असतील. पण शेवटी पक्ष म्हणूनच नेता ओळखला जातो. मी व्याख्यान देणारा कोणी आहे म्हणून लोक ओळखतात असं नाही. एका राजकीय पक्षाचा नेता म्हणूनच माझ्याकडे पाहिलं जातं. माझे सहकारी, माझा महाराष्ट्र सैनिक त्यांच्यामुळेच माझी ओळख आहे”.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns president raj thackeray mask covid 19 loksatta drusthi ani kon sgy
First published on: 01-06-2021 at 19:59 IST