सध्या राज्यात राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक यांच्याबद्दल चर्चा चालू आहे. वैद्यकीय कारणांमुळे जामीनावर तुरुंगाबाहेर आलेले नवाब मलिक गुरुवारी (७ डिसेंबर) विधीमंडळाच्या अधिवेशनात सहभागी झाले. विधानसभेत ते सत्ताधारी आमदारांबरोबर जाऊन बसल्याने मोठा गदारोळ झाला आहे. भाजपाने मलिक यांच्यावर देशद्रोहासह वेगवेगळ्या प्रकारचे आरोप केले होते. आता तेच नवाब मलिक विधीमंडळात भाजपा नेत्यांच्या मांडीला मांडी लावून बसल्याने विरोधी पक्षांनी भाजपाला कोंडीत पकडलं आहे. परिणामी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची नाराजी व्यक्त केली. नवाब मलिक यांना महायुतीत घेता येणार नाही, अशा आशयाचं पत्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठवलं आहे. फडणवीस यांच्या पत्रानंतरही विरोधी पक्ष त्यांच्यावर टीका करत आहेत.

नवाब मलिक सत्ताधारी बाकावर बसल्यामुळे शिवसेनेच्या शिंदे गटानेही नाराजी व्यक्त केली होती. मलिक यांच्यामुळे महायुतीबाबत लोकांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतं, असं वक्तव्य शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी केलं आहे. त्यामुळे महायुतीत मतभेत असल्याची चर्चा सुरू झाली. अशातच आपल्यात कोणतेही मतभेद नाहीत हे दर्शवण्याचा प्रयत्न महायुतीतले नेते करत आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल यांचा एकत्र फोटो प्रफुल्ल पटेल यांनी समाजमाध्यमांवर शेअर केला आहे.

fruad in mumbai
“दाऊद इब्राहिम माझा काका आहे”, ऑनलाईन फसवणूक करणाऱ्याचा हुशारीने केला पर्दाफाश; ‘असा’ प्रकार तुमच्याबरोबरही घडू शकतो!
Uddhav Thackeray, Mahayuti, campaign,
उद्धव ठाकरे यांना आयतेच कोलीत
sharad pawar group on prafull patel statement
“शरद पवार भाजपाबरोबर येण्यास अनुकूल”, प्रफुल्ल पटेलांच्या दाव्यावर राष्ट्रवादीच्या पवार गटाकडून स्पष्टीकरण; म्हणाले, “हा प्रस्ताव…”
Pimpri, Pimpri Mahayuti meeting
पिंपरी : महायुतीच्या बैठकीत नाराजी नाट्य! बारणे यांचा प्रचार करणार नाही, आरपीआय गटाची भूमिका

पटेल यांनी नागपूर येथे सुरु असलेल्या महाराष्ट्र शासनाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान अवकाळी पावसामुळे पूर्व विदर्भातील धान आणि इतर पिकांसह कडधान्याच्या झालेल्या नुकसानीचे तातडीने सर्वेक्षण आणि पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी आणि शेतकऱ्यांना डीबीटीच्या माध्यमातून 25 हजार रुपये हेक्टरी मदत जाहीर करावी, अशी मागणी राज्य शासनाकडे केली. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना भेटून याविषयीचं निवेदनही त्यांना दिलं. या फोटोत सर्व नेते हसत असल्याचं दिसतंय. या फोटोद्वारे पटेल यांनी महायुतीत सर्वकाही आलबेल असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, असं म्हटलं जात आहे.

हे ही वाचा >> सुषमा अंधारे यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका: म्हणाल्या, “नवाब मलिक अल्पसंख्यांक असल्यामुळे…”

दरम्यान, प्रफुल्ल पटेल यांनी शेअर केलेला फोटो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे. तसेच कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, इतका स्नेह संबंध आहे तर पत्र का लिहावं लागतं? सुहास्य वदन दाखवण्याची ही कोणती धडपड? ‘नवाब’चा ‘जवाब’ द्या किंवा नका देऊ, पण तुम्ही घातलेल्या राजकीय ढोंगीपणाच्या ‘नकाब’चा ‘जवाब’ मात्र तुम्हाला जनतेला द्यावाच लागेल. नाहीतर जनता अगदी योग्यवेळी त्यांना गृहीत धरणाऱ्यांना धडा शिकवेल!