सोलापूर : माढा लोकसभा मतदारसंघात सत्ताधारी भाजपमध्ये उमेदवारीसाठी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर व अकलूजचे धैर्यशील मोहिते-पाटील यांच्यात तीव्र संघर्ष वाढला असताना त्यांच्यातील शह-काटशहाच्या राजकारणाने आता वेगळे वळण घेतल्याचे दिसून येते. माळशिरस तालुक्यातील मोहिते-पाटील यांचे कट्टर विरोधक उत्तम जानकर यांना राष्ट्रवादी अजित पवार गटातून भाजपमध्ये पाठवून सोलापूर राखीव लोकसभेसाठी उमेदवारी मिळविण्याच्या हालचाली होत आहेत. त्यामुळे सोलापुरातील भाजपच्या वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे.

दरम्यान, आतापर्यंत सोलापूरशी संबंध नसलेल्या उत्तम जानकर यांच्या सोलापूरच्या फे-या वाढल्या आहेत. या घडामोडीचा केंद्रबिंदू माढा लोकसभा मतदारसंघातील खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर व धैर्यशील मोहिते-पाटील यांच्यातील संघर्षाशी निगडीत असल्याचे बोलले जाते.

BJP Retain Support uttam jankar, madha lok sabha seat, uttam jankar, dhairyasheel mohite patil, NCP sharad pawar group, devendra fadnavis, amit shah,
माढ्यात नुकसान नियंत्रणासाठी देवेंद्र फडणवीस सरसावले, नाराज उत्तम जानकरांना विशेष विमानाने मुंबईत पाचारण
Eknath Khadse
एकनाथ खडसे भाजपाच्या वाटेवर? राजकीय पुनर्वसनासाठी घरवापसीची शक्यता!
rohit pawar, supriya sule, baramati lok sabha
अजित पवारांनी केलेल्या सर्वेक्षणात सुप्रिया सुळे आघाडीवर; रोहित पवार म्हणाले, “सुप्रिया सुळे अडीच लाख मतांनी…”
What Bhai Jagtap Said?
भाई जगताप यांचं मोठं वक्तव्य, “मी काँग्रेस पक्षासाठी ४३ वर्षे दिली आहेत, आता…”

हेही वाचा >>>… म्हणून शरद पवार यांना नमो महा रोजगार मेळाव्याचे निमंत्रण नाही; जिल्हाधिकारी कार्यालयाने दिली ‘ही’ स्पष्टोक्ती

माळशिरसच्या राजकारणात उत्तम जानकर हे ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांचे कट्टर विरोधक मानले जातात. मोहिते-पाटील ज्या पक्षात असतील, त्याविरूध्द दुस-या पर्यायी पक्षात जाऊन जानकर हे लढतात. यात त्यांनी यापूर्वी कधी भाजप  तर कधी राष्ट्रवादी काँग्रेस अशा पर्यायी पक्षांचा आधार घेतल्याचे दिसून येते. मागील माळशिरस राखीव विधानसभा निवडणुकीत भाजपने लादलेल्या राम सातपुते यांच्या विरोधात जानकर यांनी राष्ट्रवादीकडून कडवी झुंज दिली होती. त्यावेळी सातपुते हे अवघ्या अडीच हजारांच्या आघाडीने कसेबसे विजयी झाले होते.

मोहिते-पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनीही जानकर यांना मोठी ताकद दिली होती. दरम्यान, अलिकडे त्यांनी शरद पवार यांची साथ सोडून राष्ट्रवादी अजित पवार गाटात प्रवेश केला होता. परंतु आता माढा लोकसभा निवडणुकीत उमेदवारीसाठी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर व धैर्यशील मोहिते-पाटील यांच्यात तुफान संघर्ष होत असताना जानकर हे मोहिते-पाटील यांच्या विरोधात खासदार निंबाळकर यांच्याशी जवळीक साधली आहे.

हेही वाचा >>>मंदिरात जिवंत नागपूजा, पुजाऱ्याविरोधात गुन्हा दाखल

याच पार्श्वभूमीवर अचानकपणे जानकर यांचे नाव सोलापूर राखीव लोकसभा मतदारसंघात भाजपच्या  उमेदवारीसाठी चर्चेत आले आहे. यात माढा लोकसभा मतदारसंघातील भाजपअंतर्गत राजकीय संघर्षाची पार्श्वभूमी मानली जाते. विशेषतः मोहिते-पाटील यांच्यावर दबाव आणण्याच्या हेतूने जानकर यांना सोलापूर लोकसभेच्या उमेदवारीसाठी पुढे आणले जात असल्यामुळे इकडे सोलापूरची भाजपची मंडळीशी आश्चर्यचकित झाली आहेत. जानकर हे धनगर समाजाचे असल्याचे मानले जात असले तरी त्यांच्या खाटिक समाजाचे अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र आहे. त्यांची खरी जात कोणती, हा मुद्दा प्रश्नार्थक ठरण्याची शक्यता वर्तविली जात आहे.