सांगली: बोगस गुंतवणूक कंपन्याच्या काढून सात महिन्यात दामदुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवून सुमारे सव्वा कोटी रूपयांचा गंडा घालण्यात आल्याची तक्रार विश्रामबाग पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी मुजाहिद उर्फ राज अस्लम शेख (वय 40 रा.सुभाषनगर) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सांगली जिल्हाधिकारी कार्यालयालगत विजयनगरमध्ये स्वदेशी हाईटस या इमारतीमध्ये कंपनी कार्यालय सुरू करण्यात आले होते. याठिकाणी आदित्यराज कार्पोरेशन, डेल्फिनो ट्रेड, ब्रिझ पॉवर सोल्युशन, ट्रेड बुल या नावाने कंपन्याचे कार्यालय शेख यांने सुरू केले होते. या कंपनीमध्ये रक्कम गुंतविल्यास सात महिन्यात दामदुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखविण्यात आले. या आमिषाला बळी पडून फिर्यादी चंद्रशेखर मार्तंड कोरे (रा. कुरूंदवाड) यांनी संशयिताकडे तब्बल २७ लाख ५० हजाराचीं गुंतवणूक केली. या बदल्यात आठ लाखाचा धनादेश परतावा स्वरूपात परतही दिला.
आणखी वाचा- सांगली: पहिल्या महाराष्ट्र महिला केसरीसाठी प्रतिक्षा आणि वैष्णवी यांच्यात लढत
मात्र, उर्वरित १९ लाख ५० हजार रूपये परत न करता वेळोवेळी खोटी कारणे देउन फसवणूक केली. तसेच अन्य गुंतवणूकदार प्रफुल पाटील ३३ लाख ३४ हजार ८६० रूपये, संदीप कोकाटे ६४ लाख ७ हलार ५०० रूपये, सचिन पाटील साडेपाच लाख रूपये अशी १ कोटी २२ लाख ४२ हजार ३६० रूपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फसवणुकीसह ठेवीदारांचे हितसंबंधाचे संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.