नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार दिलीप गांधी उद्या, मंगळवारी अर्ज दाखल करणार आहेत. नंतर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, पक्षाचे केंद्रीय सचिव श्याम जाजू, महायुतीतील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी आदींच्या उपस्थितीत बाजार समितीच्या आवारात सभा होणार आहे.
गांधी यांच्या नगर शहरातील प्रचार सभेला महायुतीतील मित्रपक्षाचे शिवसेनेचे नगरचे आमदार अनिल राठोड अनुपस्थित राहिले होते, राठोड आता गांधी यांचा अर्ज दाखल करण्यासाठी तरी उपस्थित राहणार का, याकडे भाजपच्या कार्यकर्त्यांचे लक्ष आहे.
मंगळवारी सकाळी ११ वाजता बसस्थानक चौकातील शिवाजीमहाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शहरातील प्रमुख रस्त्याने मिरवणूक काढण्यात येईल, अर्ज दाखल केल्यानंतर ही मिरवणूक संत जलाराम चौकमार्गे बाजार समितीच्या आवारातील सभेत दुपारी दीड वाजता रूपांतरित होईल. महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 24th Mar 2014 रोजी प्रकाशित
खा. गांधी आज उमेदवारी अर्ज भरणार
नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार दिलीप गांधी उद्या, मंगळवारी अर्ज दाखल करणार आहेत.

First published on: 24-03-2014 at 01:42 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mp gandhi will submit nominations today