अमरावतीतून भाजपाच्या तिकिटावर नवनीत राणा निवडणूक लढवणार आहेत. भाजपाची सातवी यादी जाहीर झाली. त्यात अमरावतीतून त्यांना उमेदवारी देण्यात आली. यानंतर नवनीत राणा यांनी भाजपात प्रवेश केला. भाजपात प्रवेश करण्याआधी त्यांनी युवा स्वाभिमान पक्षाचा राजीनामा दिला. त्यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले होते.

काय म्हणाल्या नवनीत राणा?

“एका छोट्या संघटनेला जिल्ह्यात पक्षाचं मोठं रुप देणं महत्त्वाचं होतं. याच पक्षाने आमदार आणि खासदारही दिला. आता मोठी जबाबदारी माझ्यावर आहे. मला या पक्षाचा राजीनामा देताना धाकधूक आहे. स्वतःच्या पक्षात काम करणं आणि त्यानंतर नवी इनिंग सुरु करणं हे आव्हानात्मक आहे. आता डोळ्यात आनंदाचे अश्रू आहेत. आज माझे डोळे पाणावले आहेत, जे होणं साहजिक आहे.” असं नवनीत राणांनी म्हटलं आहे.

bhiwandi lok sabha seat, jitendra awhad, bjp, jitendra awhad Alleges BJP, Took Crore from Torrent Power, electoral bond, ncp sharad pawar, suresh mhatre, balya mama, election campaign, lok sabha 2024, election news, marathi news
जितेंद्र आव्हाड म्हणतात, निवडणुक रोख्यांमुळेच टोरंटची दादागिरी वाढली
kolhapur, hatkanangale, BJP, Maharashtra Kranti Sena Party, Constituent Party in mahayuti, Maharashtra Kranti Sena in mahayuti, lok sabha 2024, election 2024,
महाराष्ट्र क्रांती सेना पक्षाला घटक पक्ष म्हणून मान्यता; भाजपकडून मित्र पक्षांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न
Nepotism in four out of ten Lok Sabha constituencies in Vidarbha by all political parties including bjp
विदर्भातील सर्वपक्षीय घराणेशाही, भाजपही मागे नाही
p chidambaram article the final assault on constitution
समोरच्या बाकावरून : सर्व शस्त्रांनिशी संविधानावर अंतिम हल्ला..

खासदार नवनीत राणांना भाजपाचं तिकिट

खासदार नवनीत राणा यांना भाजपाने सातव्या यादीत अमरावतीतून तिकिट दिलं आहे. नवनीत राणा बनावट जात प्रमाणपत्र सादर करून अमरावतीची लोकसभा निवडणूक लढल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. अलीकडेच मुंबई उच्च न्यायालयाने राणा यांचं जातप्रमाणपत्र रद्द करावं असा निर्णय दिला. परंतु, या निर्णयाला राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात आवाहन दिलं. उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्‍हान देणाऱ्या राणा यांच्या याचिकेवरील निकाल सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला आहे. या जातप्रमाणपत्राच्या प्रकरणामुळे राणा यांच्या उमेदवारीसमोर अडचणी येत होत्या. त्याचबरोबर नवनीत राणा कोणत्या पक्षाकडून लोकसभा निवडणूक लढवणार याबाबत संभ्रमाचं वातावरण होतं. मात्र भाजपाने उमेदवारी दिली आहे आणि त्यांना तिकिटही दिलं आहे.

हे पण वाचा- बच्चू कडू आक्रमक! “नवनीत राणांना पाडणार, स्वाभिमानाचा गुलाल उधळणार, भाजपाने…”

मागील लोकसभा निवडणुकीत (२०१९) नवनीत राणा या राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत उमेदवार होत्या. त्यावेळी त्यांनी शिवसेनेचे तेव्हाचे खासदार आनंदराव अडसूळ यांचा पराभव केला होता. नवनीत राणा यांना भाजपाने तिकिट दिल्यानंतर बच्चू कडू यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसंच आम्ही त्यांना पाडणारच असा निर्धारही बोलून दाखवला आहे. अशात आता अमरावतीत काय होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

नवनीत राणांची राजकीय वाटचाल

नवनीत कौर-राणा या चित्रपट अभिनेत्री होत्‍या. यांनी बडनेराचे आमदार रवी राणा यांच्‍याशी २०११ मध्‍ये विवाह केला. त्‍यानंतर त्‍यांनी अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र मिळवले होते. २०१४ च्‍या निवडणुकीत नवनीत राणा यांनी राष्‍ट्रवादी कॉंग्रेसच्‍या उमेदवारीवर अमरावती लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवली होती. परंतु, त्‍यावेळी शिवसेनेच्या आनंदराव अडसूळ यांनी राणा यांचा तब्बल १ लाख ३७ हजार मतांनी पराभव केला होता. राणांच्‍या जात प्रमाणपत्राविरोधात २०१७ मध्ये आनंदराव अडसूळ यांनी याचिका दाखल केली होती. याच जात प्रमाणपत्राच्या आधारे राणा यांनी २०१९ मध्ये अपक्ष उमेदवार म्‍हणून निवडणूक लढवली. त्‍यांच्‍या उमेदवारीला कॉंग्रेस आणि राष्‍ट्रवादीने पाठिंबा दिला होता. या निवडणुकीत त्यांनी अडसूळ यांचा ३७ हजार मतांनी पराभव केला होता.