पगारवाढीच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या(एसटी) कर्मचाऱयांचा संप शुक्रवारी देखील कायम आहे. एसटी कर्मचाऱयांच्या इंटक या काँग्रेस प्रणित संघटनेने हा संप पुकारला असून, यात राज्यातील ३५ हजारांहून अधिक कर्मचारी सहभागी झाले आहेत. मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत संप सुरूच ठेवण्याचा पवित्रा इंटकने घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. दरम्यान, पगारवाढीची मागणी योग्य असली तरी संप करणे चुकीचे आहे. एसटी कर्मचाऱयांना प्रवाशांना वेठीस धरू नये, असे रावते म्हणाले आहेत. तसेच संपकारी कर्मचाऱयांवर मेस्मा अंतर्गत कारवाईचेही संकेत सरकारने दिले आहेत. २५ टक्के पगारवाढीसाठी इंटक संघटनेने राज्यव्यापी संप पुकारला आहे. त्यास स्थानिक काँग्रेस नेत्यांचाही पाठिंबा आहे.
संग्रहित लेख, दिनांक 18th Dec 2015 रोजी प्रकाशित
एसटी कर्मचाऱयांचा संप आजही सुरूच, प्रवाशांचे अतोनात हाल
एसटी कर्मचाऱयांच्या इंटक या काँग्रेस प्रणित संघटनेने हा संप पुकारला आहे.
Written by मोरेश्वर येरमविश्वनाथ गरुड

First published on: 18-12-2015 at 12:29 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Msrtc workers strike continues for second day