Mumbai Goa Highway Accident News : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ९ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, अपघातात लहान मुल बचावलं आहे. या मुलावर माणगाव येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे. अपघाताची माहिती मिळताच गोरेगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, मदत कार्य सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ट्रक आणि इको कारमध्ये हा अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की, ९ जण जागीच ठार झाले आहेत. यामध्ये ४ महिला आणि ५ पुरुषांचा समावेश आहेत. या अपघातात ४ वर्षाचं लहान मुल बचावलं आहे. त्याच्यावर माणगाव येथीस सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पहाटे पाचच्या सुमारास ट्रक चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि तो विरुद्ध दिशेला जावून समोरून येणाऱ्या इको कारला धडकला. याची माहिती मिळताच गोरेगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अपघातामुळे महार्गावार वाहतूक विस्कळीत झाली आहे. तसेच, अपघातग्रस्त कार बाजूला करण्यात येत आहे.