अहिल्यानगर : शहराच्या सावेडी उपनगरातील नैसर्गिक ओढे व नाल्यांलगत संरक्षक भिंती बांधण्यात आल्या. या अनधिकृत बांधकामांवर महापालिकेने कारवाई सुरू केली आहे. दिवसभरात संरक्षक भिंतींचे चार अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली.

मनपाने पावसाळा सुरू होण्यापूर्वी शहरातील ओढे व नाल्यांची साफसफाई केली. गाळ, कचरा काढून प्रवाह मोकळे केले. नालेसफाई करताना पाइपलाइन रस्त्यावरील सिटी प्राइड हॉटेल, शिरसाठ मळा, वैष्णवी कॉलनी परिसरात नाल्यालगत संरक्षक भिंतींची अतिक्रमणे अडथळा ठरत होती. सावेडी प्रभाग समिती कार्यालयाच्या पथकाकडून या ठिकाणी कारवाई करण्यात आली.

सिटी प्राईड हॉटेल ते शिरसाठ मळा रस्त्यावर तीन संरक्षक भिंतींची अतिक्रमणे मनपा पथकाकडून कारवाई करून हटवण्यात आली. तसेच, पाइपलाइन रस्त्यावरील वैष्णवी कॉलनी येथे कायम पाणी साचून राहते, तातडीची उपाययोजना म्हणून येथील छोट्या नाल्यालगत असणारे संरक्षक भिंतीचे अतिक्रमणही हटविण्यात आले. नालेसफाई करताना येणारे अडथळे, अडलेले पाण्याचे प्रवाह मोकळे करण्यासाठी आवश्यक उपाययोजना व कारवाई केली जात असल्याचे आयुक्त डांगे यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मनपाने पावसाळा सुरू होण्यापूर्वी शहरातील ओढे व नाल्यांची साफसफाई केली. गाळ, कचरा काढून प्रवाह मोकळे केले. नालेसफाई करताना पाइपलाइन रस्त्यावरील सिटी प्राइड हॉटेल, शिरसाठ मळा, वैष्णवी कॉलनी परिसरात नाल्यालगत संरक्षक भिंतींची अतिक्रमणे अडथळा ठरत होती.