आगामी विधानसभा निवडणूक जशी जशी जवळ येत आहे, तसे तसे राज्यातील वेगवेगळे नेते मुख्यमंत्रीपदाच्या मुद्द्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी विद्यमान विरोधी पक्षनेते अजित पवार यांना मुख्यमंत्री करायचं आहे, तयारीला लागा; असे विधान केले होते. तर अजित पवार यांच्यात मुख्यमंत्री बनण्याची ताकद आहे. ते या पदासाठी सक्षम आहेत, असे राष्ट्रवादीचे आमदारा रोहित पवार म्हणाले आहेत. याच कारणामुळे महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यावरच आता काँग्रेसमधील मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यासंदर्भात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते ‘टीव्ही ९ मराठी’ने आयोजित केलेल्या एका विशेष कार्यक्रमात बोलत होते.

हेही वाचा >>> भाजपा, एकनाथ शिंदे अन् शिवसेनेतील बंडखोरी; अजित पवारांची चौफेर फटकेबाजी; म्हणाले “आपल्याला बदला…”

मी मुख्यमंत्री होण्यासाठी पक्ष…

‘राष्ट्रवादीमध्ये अजित पवार, ठाकरे गटात उद्धव ठाकरे भाजपात देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रिपदासाठीचे चेहरे आहेत. मग काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार कोण आहे?’ असा प्रश्न नाना पटोले यांना विचारण्यात आला. या प्रश्नाचे उत्तर देतान “मी मुख्यमंत्री होण्यासाठी पक्ष वाढवण्याचे काम करतोय, असे काही नाही. शेवटी हायकमांड जो निर्णय घेईल, त्या निर्णयाला मान्यता देणे माझी जबाबदारी आहे,” असे नाना पटोले यांनी सांगितले.

हेही वाचा >>> नाना पटोलेंचा भाजपावर गंभीर आरोप, अनिल देशमुखांवर बोलताना म्हणाले, “परमबीर सिंह यांचे १०० कोटी….”

मला जी संधी मिळाली त्या संधीचे मी सोने केले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“मी विधानसभेचा अध्यक्ष झाले. मी विधानसभेच्या खुर्चीवर कधीही बसलेलो नव्हतो. मी आणि देवेंद्र फडणवीस १९९९ साली दोघेही विधानसभेत एकत्रच गेलो. माझा थोडा काळ खासदार म्हणून दिल्लीमध्ये गेला. मात्र मी या व्यवस्थेत सतत होता. विधानसभा अध्यक्षपदाचा उपयोग जनतेसाठी होऊ शकतो. मला जी संधी मिळाली त्या संधीचे मी सोने केले. त्या संधीचा फायदा जनतेला तसेच पक्षाला व्हावा असे समजणारा मी कार्यकर्ता आहे. त्यामुळे कोणाला मुख्यमंत्री करायचे हा हायकमांडचा प्रश्न आहे,” असेही नाना पटोले यांनी सांगितले.