नांदेड : ओबीसीमधील जातींमध्ये काँग्रेस भांडण लावत आहेत. कारण असे भांडण लावून त्यांना त्यांच्या आरक्षणावर घाला घालायचा आहे. त्यामुळे ‘एक रहेंगे तो ‘सेफ’ रहेंगे’ असे घोषवाक्य पंतप्रधान नरेंद मोदी यांनी प्रचारसभेत उपस्थितांना म्हणायला लावले. मराठवाड्यात ८० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. लॉजिस्टिक पार्कमुळे तसेच समृद्धी महामार्गामुळे मराठवाड्यात रोजगारांच्या संधी वाढतील. गेल्या वेळी नांदेडमधून दिल्लीला ‘कमळ फूल’ पाठवले नव्हते, अशी खंत व्यक्त करून आता ती संधी असल्याचे आवाहन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओबीसी मतांना साद घातली.

दहा वर्षांत ओबीसी पंतप्रधान आहे. तो सर्वांना बरोबर घेऊन चालला आहे. त्यामुळे ओबीसींना वेगवेगळ्या जातींमध्ये विभागण्याचे ठरवले आहे. ‘ओबीसी’ प्रवर्गाची ओळख पुसून त्यांची विभागणी व्हावी अशी काँग्रेसची इच्छा आहे. त्यामुळे बटेंगे तो संख्या कम होगी. मग तुमचे आरक्षण काढून घेतले जाईल. हे प्रयत्न पंडित जवाहरलाल नेहरूंपासून राजीव गांधींपर्यंत सर्वांनी केले होते. आता तेच काम, तीच चलाखी करून काँग्रेसचे शहजादे करत आहेत, त्यामुळे अशा प्रवृत्तींपासून सावध राहा, असे आवाहन नरेंद्र मोदी यांनी केले. या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अशोक चव्हाण यांची उपस्थिती होती.

हेही वाचा >>>Dhananjay Mahadik : Video : “लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी काँग्रेसच्या रॅलीत दिसल्या तर..”, भाजपा खासदार धनंजय महाडिकांचं वादग्रस्त विधान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अशोक चव्हाण व्यासपीठावर

आदर्श सोसायटी गैरव्यवहारप्रकरणी आरोपींना कारागृहात पाठवू, असे जाहीरपणे सांगणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शनिवारच्या सभेच्या व्यासपीठावर अशोक चव्हाण शेजारीच बसलेले होते. लोकसभेनंतर पुन्हा विधानसभेच्या प्रचारातही दोघांना एकत्र पाहिल्यावर ‘आदर्श’ प्रकरणावरील वक्तव्याची नांदेडकरांमध्ये चर्चा झाली.