नशिकमधील कुख्यात गुंड भीम पगारे याची हत्या करण्यात आली आहे. रात्री साडेअकराच्या सुमारास राजीव नगर भागात पगारेवर गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. पगारेला त्याच्या विरोधी टोळीतील गुंडांनी मारल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
जीव नगर परिसरात पगारे याच्यावर प्रथम चाकूने हल्ला केला त्यानंतर त्यावर गोळ्या झाडण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. पगारेवर खून, खंडणी आणि अन्य गुन्हे दाखल होते. या गुन्हांमुळेच पगारेला तडीपारही करण्यात आले होते.