राज्यातील जनतेच्या हिताचे सरकार हे संजय राऊत यांच्यामुळेच आले असल्याची खोचक टीका अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केली आहे. तसेच संजय राऊतांमुळेच उद्धव ठाकरे घरी बसले असून त्यांचे अभिनंदन करायला पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.

काय म्हणाल्या नवनीत राणा?

”आपण सर्वांनीच संजय राऊत यांचे अभिनंदन केले पाहिजे. मी सुद्धा त्यांचे अभिनंदन करते. त्यांच्यामुळेच राज्यात जनतेच्या हिताचे सरकार आले आहे. आता कुठे महाराष्ट्राला खरा अर्थाने न्याय मिळाला आहे. उद्धव ठाकरेंना घरी बसनवण्याचे काम संजय राऊतांनी केले आहे”, अशी प्रतिक्रिया नवनीत राणा यांनी दिली आहे.

हेही वाचा – आसाममध्ये अल कायदाशी संबंधित ११ दहशतवादी पोलिसांच्या ताब्यात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राणा-शिवसेना संघर्ष

गेल्या काही दिवसांपासून राज्यात राणा दाम्पत्य आणि शिवसेना यांच्या संघर्ष सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे यांनी हनुमान चालीसा पठण करावे, अशी मागणी दोघांनी केली होती. तसेच मुंबईत जाऊन उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी जाऊन हनुमान चालिसा पठण करण्याची घोषणाही त्यांनी केली होती. मात्र, राणा दाम्पत्य मुंबईत पोहोचताच त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. त्यावेळी दोघेही १४ दिवस न्यायालयीन कोठडीत होते.