रविवारी नक्की कोणता खळबळजनक खुलासा होणार? नवाब मलिकांच्या ‘खास’ दिवाळी शुभेच्छा चर्चेत

नवाब मलिकांच्या या सूचक ट्वीटमुळे आता राज्याचं लक्ष रविवारकडे लागलेलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी सतत काही ना काही खुलासे करण्याचा सपाटाच सध्या लावलेला आहे. सूचक असे ट्विट करुन त्यानंतर काही वेळातच पत्रकार परिषद घेत ते नवनवे आरोप करत आहेत. त्यांचं लक्ष्य आहे NCBचे विभागीय संचालक समीर वानखेडे. आर्यन खानवर झालेल्या कारवाईनंतर नवाब मलिक आणि वानखेडेंमध्ये चाललेला आरोप-प्रत्यारोपांचा खेळ नक्की कोणतं वळण घेणार याकडे आता महाराष्ट्राच्या जनतेचं लक्ष लागलेलं आहे. आज आणखी एक सूचक ट्वीट करत मलिकांनी उत्सुकता वाढवली आहे.

नवाब मलिकांनी आज ट्वीट करत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. एवढंच नव्हे तर त्यांनी एका नव्या खुलाशाचा सूचक इशाराही या ट्वीटमधून दिला आहे. आपल्या ट्वीटमध्ये ते म्हणतात, “शुभ दीपावली. तुम्हा सर्वांची दिवाळी मंगलमय होवो. हॉटेल ललितमध्ये अनेक रहस्य लपलेली आहेत. तेव्हा भेटूया रविवारी”.

त्यांच्या या ट्वीटची आता चांगलीच चर्चा रंगत आहे. रविवारी कोणता नवा खुलासा नवाब मलिक करणार याकडे अनेकांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. दरम्यान राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी आज आणखी एक ट्वीट केलं आहे. या ट्विटमध्ये ते म्हणतात, “बात निकलेगी तो फिर दूर तलक जायेगी, लोग बेवजह उदासी का सबब पूछेंगे”

हेही वाचा – “बात निकलेगी तो फिर…”, नवाब मलिक यांच्या नव्या ट्वीटची जोरदार चर्चा

नवाब मलिक यांनी हे ट्वीट केल्यानंतर काही वेळातच यावर प्रतिक्रियांचा पाऊस आलाय. तसेच अनेकजण हे ट्वीट लाईक आणि रिट्वीट देखील करत आहे. या ट्वीटवर आलेल्या प्रतिक्रियांमध्ये जशा नवाब मलिक यांच्या कौतुकाच्या प्रतिक्रिया आहेत तशाच त्यांच्यावर टीका करणाऱ्या देखील आहेत.दरम्यान, नवाब मलिक यांनी आपल्या आधीच्या पत्रकार परिषदांमध्ये बोलताना भाजपच्या अनेक नेत्यांचा खरा चेहरा समोर आणणार असल्याचा इशारा दिलाय. यात त्यांनी प्रतिक गाबापासून अनेकांचा उल्लेख केलाय. तसेच आगामी विधानसभा अधिवेशनात सदनाच्या पटलावर या सर्वांवरील आरोपांबाबतचे पुरावे ठेवणार असल्याचं म्हटलंय.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Nawab malik new tweet says will open up some secrets on sunday vsk

Next Story
‘कोरा कागद निळी शाई, आम्ही कोणाला भीत नाही’!
ताज्या बातम्या