गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि काँग्रेस नेते बापू तलांडी यांची नक्षलवाद्यांनी आज पहाटे हत्या केली. आलापल्ली सिरोंचा मार्गावरील निर्मल गुडम येथे सकाळी ८ वाजता ही घटना घडली.
गडचिरोलीतील निमलगुडा या गावात राहणा-या बापू तलांडी यांना रविवारी सकाळी अज्ञात नक्षलवाद्यांनी गाठले. यानंतर गोळी झाडून त्यांची हत्या करण्यात आली.  या हल्ल्यानंतर निमलगुडा गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.