वाई:रयत देशातील सर्वात महत्वाची संस्था असून जगातील बदलांची नोंद घेत संस्था आता वेगळ्या वळणावर आली आहे. जगातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या आयबीएमशी करार करून कृत्रीम बद्धीमत्ता़ (आर्टीफिशियल इंटेलिजन्सीचे) ज्ञान घेण्याची सुविधा उपलब्ध करणार आहे. हा विषय घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नोकरीची हमी दिली जाईल, अशी ग्वाही रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी दिली.

सातारा जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात खासदार शरद पवार यांच्या ८२ व्या वाढदिवसानिमित्त तसेच रयत शिक्षण संस्थेतील ५० वर्षांच्या सक्रिय योगदानाबद्दल अभिष्टचिंतन आणि कृतज्ञता सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी जेष्ठ शास्त्रज्ञ डॉ.रघुनाथ माशेलकर यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी खासदार श्रीनिवास पाटील होते.

यावेळी सिंबॉयसिसचे डॉ. शा. ब. मुजुमदार, खासदार श्रीनिवास पाटील, माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, दिलीप वळसे पाटील, संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. अनिल पाटील, उपाध्यक्ष ॲड. भगिरथ शिंदे, सचिव प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवणकर, सहसचिव, प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे, प्राचार्य राजेंद्र साळुंखे, आमदार बाळासाहेब पाटील, मकरंद पाटील, शशिकांत शिदे, मॅनेजिंग कौंन्सिलचे सदस्य, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.

पवार म्हणाले, कर्मवीरांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सर्वापर्यंत शिक्षण पोचविण्याचे कार्य केले.

सर्वसामान्यांपर्यंत शिक्षण पोचविले. रयत देशातील सर्वात महत्वाची संस्था आहे. आता रयत वेगळ्या वळणावर आहे. डॉ. अनिल पाटील यांनी खांद्यावर जबाबदारी घेऊन प्रारंभ केला आहे. जगातील बदलांची नोंद घेऊन त्याप्रमाणे शिक्षण देण्याची आज आवश्‍यकता आहे. त्यासाठी आम्ही जगातील सर्वात मोठी कंपनी आयबीएमसोबत कृत्रीम बुद्धीमत्तेचे ज्ञान देण्याची सुविधा उपलब्ध करणार आहोत.

त्यासाठी त्या कंपनीशी करार होणार आहे. जे विद्यार्थी दहावी, बारावी तसेच पदवीधर होत असताना त्यांनी हा विषयही घ्यावा. अशा विद्यार्थ्यांना नोकरीची हमी दिली जाणार आहे. कर्मवीरांनी संस्था सुरु केली तेव्हा शिक्षित आणि अशिक्षित अशी स्थिती होती. आता परिस्थिती वेगळी आहे. विद्यार्थ्यामध्ये वैचारीक दृष्टीकोन वाढविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

यशवंतराव चव्हाण हेच आमचे आदर्श

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

माझ्या जीवनात साताऱ्याला विशेष स्थान आहे. कारण माझं कुटुंब मुळचे साताऱ्याचे असून काही कारणास्तव आम्हाला बारामतीला जावे लागेल. आम्ही तेथेच स्थायिक झालो. कोरेगाव तालुक्यातील आमचे गाव आहे. ज्यावेळी मी राजकारणात जाण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी राजकिय क्षेत्राच्या सुरवातीच्या काळात यशवंतराव चव्हाण हेच आमचे आदर्श होते.