महाराष्ट्रासह देशभरात आजही अनेक भागांमध्ये स्त्री-भ्रुण हत्येसारखे प्रकार सुरु आहेत. या गोष्टींवर आळा घालण्यासाठी राज्यात आणि केंद्र सरकारने अनेक कठोर कायदे केले आहेत, मात्र तरीही अनेकदा मुलीला कचऱ्याच्या पेटीजवळ किंवा निर्जन ठिकाणी एकटं सोडून आई-बाप निघून गेल्याचे प्रकार समोर येतात. अनेकदा जागरुक नागरिकांमुळे अशा नकोशा मुलींचे प्राण वाचतात, तर काहीवेळा त्यांना आपल्या प्राणाला मुकावं लागतं.
मात्र महाराष्ट्राचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी एक वेगळा आदर्श घालून दिला आहे. रेल्वे-ट्रॅकजवळ काटेरी झुडुपात मुलीला सोडून कोणीतरी पळ काढला. पालकमंत्री धनंजय मुंडे यांना ही गोष्ट समजताच…त्यांनी तात्काळ या मुलीला वैद्यकीय उपचारांसाठी दवाखान्यात दाखलं केलं. इतकच नव्हे तर धनंजय मुंडेंनी या मुलीचं पालकत्व स्वीकारलं असून तिच्या शिक्षणासह लग्नापर्यंतची सर्व जबाबदारी खासदार सुप्रिया सुळे आणि धनंजय मुंडे यांनी स्विकारली आहे. धनंजय मुंडेंनी या मुलीचं नाव शिवकन्या असं ठेवलं आहे.
पोटी जन्मलेल्या लेकीला ‘नकोशी’ म्हणत रेल्वे पटरी जवळ काटेरी झुडुपात टाकून कोणीतरी पळ काढला. पालकमंत्री @dhananjay_munde साहेबांना या गोष्टीची माहिती मिळताच लेकींचा बाप असलेल्या तुम्हाला मला वाटावी त्या संवेदनशीलतेने तात्काळ त्या लेकीचे पालकत्व स्वीकारून, तिचा उपचार, तिचे शिक्षण , pic.twitter.com/ei293W3UiY
— बीड जिल्हा राष्ट्रवादी (@NCPSpeakBeed) February 24, 2020
लग्नसहित तिची जबाबदारी खा. @supriya_sule ताई मदतीने ना. मुंडे साहेबांनी घेतली. झालेला प्रकार संतापजनकच तसेच ना. साहेबांनी व्यक्त केलेली संवेदनशीलता तितकीच वाखाणण्याजोगी!! ती सध्या सुखरूप असून पुढील उपचार घेत आहे… ना. साहेबांनी तिचे नाव ‘शिवकन्या’ ठेवले आहे…@NCPspeaks
— बीड जिल्हा राष्ट्रवादी (@NCPSpeakBeed) February 24, 2020
धनंजय मुंडेंनी आपल्या कार्यकर्त्यांकरवी या मुलीच्या उपचाराची सर्व सोय केली असून तिची प्रकृती आता स्थिर असल्याचं समजतं आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर धनंजय मुंडेंनी दाखवलेल्या संवेदनशीलतेचं कौतुक होताना दिसत आहे.