जगभरात १४ फेब्रुवारी हा दिवस ‘व्हॅलेंटाईन डे’ अर्थात ‘प्रेमदिवस’ म्हणून साजरा केला जातो. पण केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय मंत्रालयाने हा दिवस ‘काऊ हग डे’ म्हणजेच गाईला मिठी मारून साजरा करावा, असं आवाहन केलं आहे. त्यासाठी एक परिपत्रकही विभागाच्या वतीने जारी केलं आहे. या घटनाक्रमानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी तुफान टोलेबाजी केली आहे.

केंद्र सरकारची गाईला मिठी मारण्याची कल्पना आपल्याला फार आवडली. मात्र, ‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी मिठी मारण्यासाठी गाय कुठून आणायची? केंद्र सरकार गाईची सोय करणार आहे का? असा सवाल आव्हाडांनी विचारला आहे. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.

Dindori, Mahavikas Aghadi,
दिंडोरीत महाविकास आघाडीतील बंड रोखण्याची धडपड, माकपची जयंत पाटील यांच्याकडून मनधरणी
Stone Pelting in West Bengal
Ram Navami : पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, मिरवणुकीत दगडफेक; पोलिसांकडून अश्रूधुराच्या नळकांड्यांचा वापर!
jitendra awhad marathi news, lucky compound building collapse marathi news
“लकी कंपाऊंड दुर्घटनेनंतरही अधिकाऱ्यांनी शिकायला हवे होते, पण…”, आमदार जितेंद्र आव्हाड यांची पालिका अधिकाऱ्यांवर टीका
nashik crime news, nashik frau marathi news
नाशिकमध्ये कर्जदारांची मालमत्ता ताब्यात घेत फसवणूक, दोन सावकारांविरोधात गुन्हा; छाप्यात करारनामे, कोरे मुद्रांक, धनादेश जप्त

गाईला मिठी मारण्याबाबतच्या परिपत्रकावर भाष्य करताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, “१४ फेब्रुवारी हा दिवस ‘व्हॅलेंटाईन डे’ म्हणून साजरा केला जातो. एक प्रेमाचं प्रतीक म्हणून हा दिवस साजरा केला जातो. गेल्या अनेक वर्षांत ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करण्याचं स्वरुप बदलत गेलं आहे. भारतातील स्वरुप तर अजून बदलून गेलंय. भारताच्या स्वरुपात त्यांनी (केंद्र सरकार) सांगितलं की, ‘गाईला मिठी मारा.’ पण ‘व्हॅलेंटाईन डे’ हा कुणी-कुणाला मिठी मारण्याचा दिवस नाही. तो एक प्रेमाचा दिवस आहे. तुमची आईही तुमचं प्रेमाचं प्रतीक असू शकते.”

“प्रेम कुणावर करावं यासाठी काहीही बंधणं नसतात. प्रेम कुणावर करावं? याबाबत काही आचारसंहिता नाहीये. आता त्यांनी सांगितलं की, गाईवर प्रेम करा… गाईवर प्रेम करायला तशी काही हरकत नाही. पण गाय आणायची कुठून? हा प्रश्न आहे. त्यादिवशी हजारोंच्या संख्येनं तरुण-तरुणी बाहेर पडतात. मग त्यांच्यासाठी गाई शोधायच्या कुठे? त्यांना गाय मिळणार कुठे? मग सरकार कुठल्या तरी ठिकाणी गाई उभ्या करणार आहे का?” असे सवाल आव्हाडांनी उपस्थित केले.

हेही वाचा- Cow Hug Day : ‘१४ फेब्रुवारीला गायीला मिठी मारा’ केंद्र सरकारच्या निर्देशावर अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले, “कोणाला मिठ्या…”

केंद्र सरकारवर उपरोधिक टीका करताना आव्हाड पुढे म्हणाले, “गाईला मिठी मारताना अनेक अडचणी आहेत. गाईला पुढून मिठी मारली तर ती शिंग मारणार आणि मागून मिठी मारली तर ती लाथ मारणार… तिचं पोट इतकं मोठं असतं की तिच्या पोटाला मिठीच मारता येणार नाही. त्यामुळे गाईला मिठी कशी मारायची? याचं प्रात्यक्षिक तुम्हाला दाखवावं लागेल. त्यासाठी ‘सरकार गाईला मिठी कशी मारायची?’ याचं प्रात्यक्षिक टीव्हीवर वगैरे दाखवणार आहे का? अशा अनेक अडचणी आहेत.

हेही वाचा- “मी शरद पवारांना नेहमी…”, काँग्रेसवर टीका करताना PM मोदींकडून पवारांचं पुन्हा कौतुक!

“गाईला मिठी मारण्याची कल्पना आम्हाला खूप आवडली. पण गाईची सोयही केली पाहिजे. सरकारने गाय उपलब्ध करून दिली नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेसने तो उपक्रम हाती घेतला पाहिजे. कारण तसं केंद्र सरकारचं परिपत्रक आहे. त्यामुळे हा दिवस उत्साहात साजरा केला पाहिजे. पण २४ तास आधी गाईला मिठी कशी मारायची? याचं प्रात्यक्षिक टीव्हीवर दाखवलं पाहिजे. गाईला मिठी मारताना काय काळजी घ्याल? कुठल्या भागाला मिठी माराल? हे दाखवलं तर बरं होईल. नाहीतर एखादी लाथ बसली तर सगळं आत जायचं… आणि एखादा व्यक्ती मारला जायचा. गाईने शिंग खुपसलं तर विकेटच पडायची,” अशी तुफान टोलेबाजी जितेंद्र आव्हाडांनी केली आहे.