आशिया चषकातील भारत आणि पाकिस्तानमधील तिसरा सामना अनिर्णित राहिला. पावसाने व्यत्यय आणल्याने भारत-पाकिस्तानमधील हाय होल्टेज सामना रद्द करावा लागला. या सामन्यानंतर एका पाकिस्तानी तरुणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये संबंधित तरुणी भारतीय फलंदाज विराट कोहलीवर स्तुतीसुमनं उधळताना दिसत आहे. संबंधित तरुणी खास विराट कोहलीची फलंदाजी पाहण्यासाठी पाकिस्तानहून श्रीलंकेत आली होती. पण विराट कोहली लवकर आऊट झाल्याने तिचा भ्रमनिरास झाला. तिचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनीही तिचा हा व्हिडीओ शेअर करत टिप्पणी केली आहे.
हेही वाचा >> “मेरा दिल टूट गया”; पाकिस्तानी तरुणी विराट कोहलीवर फिदा, VIDEO तुफान व्हायरल
व्हायरल व्हिडीओमध्ये तरुणीने काय म्हटलंय?
व्हायरल व्हिडीओत संबंधित तरुणी म्हणाली, “विराट कोहली हा माझा आवडता खेळाडू आहे. मी खास त्याच्यासाठी इथे मॅच बघायला आले होते. तो शतक करेल, असं मला अपेक्षित होतं. पण माझा अपेक्षाभंग झाला. मी पाकिस्तान आणि विराट कोहली दोघांनाही पाठिंबा देत आहे.” दरम्यान, एका पाकिस्तानी व्यक्तीने संबंधित तरुणीच्या बोलण्यात हस्तक्षेप केला आणि विराट कोहलीला सपोर्ट का करतेय? असं विचारलं, यावर तरुणीने पाकिस्तानी व्यक्तीला सडेतोड उत्तर दिलं. ती म्हणाली, “चाचा, शेजाऱ्यांवर प्रेम करणं चुकीचं तर नाही ना…”
हेही वाचा >> IND vs PAK: भारत-पाकिस्तान सामन्यात पावसाने मारली बाजी, बाबर आझमचा संघ सुपर-4 मध्ये दाखल
जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?
“ही पाकिस्तानी मुलगी मनमोकळेपणाने विराटची स्तुती करतेय. आपल्याकडे कुणी बाबर आझमचं कौतुक केलं तर त्याची कबर खोदतील”, असं ट्वीट जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.
जितेंद्र आव्हाड यांच्या या ट्वीटवर अनेकांनी कमेंट्सही केल्या आहेत. “काही म्हणा तुमच्या मतदारसंघाला खुश करेल असं मटेरियल मस्त शोधून काढता. धंदा हैं पर गंदा है. काय करणार. जनाची आणि मनाची, याचा तुमच्याशी काय संमंद? जैसा गुरू, तैसा चेला”, अशी टीका एका नेटकऱ्याने केली आहे.