राष्ट्रवादीचे मोहोळचे आमदार रमेश कदम यांना १४ दिवसांची न्यायलयीन कोठडी न्यायालयाने सुनावली आहे. मोहोळ न्यायालयाने ही शिक्षा सुनावली असून आमदार कदम यांच्यासह ५७ आंदोलकांनाही न्यायालयीन कोठडीत धाडण्यात आले आहे.
शनिवारी मोहोळ पोलीस ठाण्यावर समर्थकांनी हल्ला करुन शासकीय कामात अडथळा आणणे, तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्या प्रकरणी आ.रमेश कदम विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी मोहोळचे आमदार रमेश कदम यांच्यासह त्यांच्या समर्थकांना मोहोळ दिवाणी न्यायालयात आज हजर करण्यात आले होते. याप्रकरणी न्यायालयाने आमदार कदम यांच्यासह अन्य ५७ कार्यकर्त्यांना १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
सोलापूर-पुणे महामार्गाचे चौपदरीकरण झाल्यानंतर मोहोळ येथे पुलाखाली मोकळ्या जागेत अतिक्रमण होऊ नये म्हणून संरक्षक जाळी बसविण्यात आली होती. परंतु ही जाळी आमदार कदम यांच्या सांगण्यावरून जेसीबी यंत्राच्या साह्य़ाने परस्पर काढण्यात आल्यामुळे आमदार कदम यांच्यासह तिघाजणांविरुध्द मोहोळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. ही कारवाई जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे यांच्या सांगण्यावरून केल्याचा राग मनात धरून आमदार कदम हे जिल्हा प्रशासनाच्या विरोधात भूमिका घेत स्वत: अटक करवून घेण्यासाठी शनिवारी दुपारी हजारो समर्थकांसह मोहोळ पोलीस ठाण्यावर गेले. पोलिसांनी या अटक मोर्चाला परवानगी नाकारली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp legislator ramesh kadam sentence to judicial custody
First published on: 05-07-2015 at 02:53 IST