मंत्रीमंडळ विस्तारानंतर भाजपामध्ये महत्वाची खाती असल्याने शिंदे गटामध्ये नाराजी असल्याच्या चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळामध्ये सुरु असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी याच खातेवाटपावरुन मोठं भाकित व्यक्त केलं आहे. शिंदे गटातील काही आमदार खातेवाटपावरील नाराजीमुळे पुन्हा ‘मातोश्री’मध्ये जाऊन बसतील, असं मिटकरी म्हणाले आहेत. इतकच नाही तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी गृह आणि अर्थ खातं मागितलं होतं असा दावाही मिटकरींनी केला आहे.

नक्की वाचा >> सर्व प्रभावी, मलईदार खाती भाजपाकडे : मुख्यमंत्री शिंदेंना खातेवाटपावरुन प्रश्न विचारला असता म्हणाले, “खातं कोणतं…”

शिंदे गटाकडे आणि भाजपाकडे कोणी खाती?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरविकास खाते कायम ठेवले असून, गृह आणि अर्थ ही सर्वात प्रभावी खाती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपविण्यात आली आहेत. आधीच्या उद्धव ठाकरे सरकारमध्ये शिवसेनेकडे असलेल्या मंत्र्यांची खाती शिंदे गटाकडे कायम ठेवण्यात आली आहेत. राष्ट्रवादीकडे असलेली सर्व प्रभावी आणि मलईदार खाती भाजपाच्या वाट्याला गेली आहेत. शिंदे गटाकडे नगरविकास, परिवहन, सार्वजनिक आरोग्य, सामाजिक न्याय, कृषी, सार्वजनिक बांधकाम (रस्ते विकास मंडळ), पणन, पर्यावरण, मदत व पुनर्वसन, अल्पसंख्याक, उद्योग, पाणीपुरवठा, बंदरे, खाणकाम, अन्न व औषधे प्रशासन, शालेय शिक्षण ही खाती आली आहेत.

PSI Sanjay Sonawane, nagpur,
पीएसआय संजय सोनवणे म्हणतात, “मी पोलीस आयुक्तांना ओळखत नाही,” नेमका काय आहे प्रकार? जाणून घ्या…
Prime Minister Narendra Modi slams congress over development
‘मोदींची गॅरंटी’ म्हणजे क्षणाक्षणाची मेहनत! वर्ध्यात नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन
Violation of Right to Information by Regional Psychiatric Hospital in Nagpur
नागपुरातील प्रादेशिक मनोरुग्णालयाकडून माहिती अधिकाराचा भंग, सामाजिक कार्यकर्ते म्हणतात…
gaanewali program at tarun tejankit
सक्षम भविष्याचे स्वप्न सत्यात उतरवणाऱ्या प्रज्ञेचा सन्मान

नक्की पाहा >> संजय राठोडांचा एकेरी उल्लेख करत पूजा चव्हाणच्या आजीची शिंदे सरकावर टीका; म्हणाल्या, “पोलीस क्लीन चीट देऊ शकतात पण तो…”

फडणवीसांच्या निकटवर्तीयांना महत्त्वाची खाती
गृह, अर्थ, महसूल, सहकार, उर्जा, गृहनिर्माण, जलसंपदा, ग्रामविकास, आदिवासी विकास, वैद्यकीय शिक्षण ही सर्व महत्त्वाची खाती भाजपाकडे राहणार आहेत. भाजपामध्ये खातेवाटपाच्या यादीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र निकटवर्तीयांच्या वाट्याला महत्त्वाची खाती आली आहेत. मावळते प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य ही खाती सोपविण्यात आली आहेत. आधीच्या फडणवीस सरकारमध्ये चंद्रकांतदादांनी महसूल, सार्वजनिक बांधकाम, सहकारसारखी महत्त्वाची खाती भूषविली होती. या तुलनेत उच्च व तंत्रशिक्षण वा वस्त्रोद्योग ही दुय्यम खाती मानली जातात. सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे त्यावेळी अर्थ आणि वने ही खाते होती. आता त्यांच्याकडे वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्सव्यवसाय या खात्यांचा पदभार सोपविण्यात आला आहे.

पाहा व्हिडीओ –

नक्की वाचा >> मध्यरात्रीच्या ध्वजारोहण सोहळ्यात ठाकरे विरुद्ध शिंदे समर्थक वाद थोडक्यात टळला; मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पार पडला सोहळा

शिंदेंकडून गृह आणि अर्थ खात्याची मागणी पण…
अमोल मिटकरींनी मंत्रीमंडळ विस्तारानंतर प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना, “ज्या अपेक्षेने शिंदे गट फडणवीसांसोबत किंवा भाजपासोबत गटबंधनामध्ये, सत्तेमध्ये आला त्या अपेक्षेचा या खातेवाटपामुळे भ्रमनिरास झालेला आहे,” असं म्हटलं आहे. “शिंदेंकडून गृह आणि अर्थ खात्याची मागणी करण्यात आली होती पण ती फडणवीसांनी आपल्याकडे ठेऊन घेतली. फडणवीसांनी महत्वाची खाती आपल्याकडेच ठेवली,” असा दावाही मिटकरींनी केला आहे.

हिंदुत्वाच्या जोरावर शिंदे गटात असलेल्या अब्दुल सत्तार यांच्याकडे…
“मंगलप्रभात लोढांकडे महिला व बालकल्याण खातं देऊन त्यांनी कमालच केली आहे. मागच्यावेळेस दादा भुसेंनी कृषी खातं व्यवस्थित संभाळलं. त्यांच्याकडे बंधारे दिलं. हिंदुत्वाच्या जोरावर शिंदे गटात असलेल्या अब्दुल सत्तार यांच्याकडे खातं काय दिलं तर कृषी खातं दिलं,” असंही मिटकरी म्हणाले आहेत.

नक्की पाहा >> Photos: “…तर बावनकुळेंना मुख्यमंत्री होण्याची संधी”; देवेंद्र फडणवीस मंचावर असतानाच नितीन गडकरींचं सूचक विधान

अनेक आमदार परत फुटून ‘मातोश्री’मध्ये बसण्याची शक्यता
“हे सगळं खातेवाटप पाहिलं तर हा फक्त आणि फक्त शिंदे सरकारमध्ये आलेल्या शिंदे समर्थक आमदारांच्या तोंडाला पानं पुसण्याचा प्रकार आहे. यामध्ये कोणीही समाधानी नाही. या खातेवाटपानंतर अनेक आमदार परत फुटून ‘मातोश्री’मध्ये बसण्याची शक्यता आहे. या खातेवाटपावरुन भविष्यात महाराष्ट्रात रणकंदन होण्याची शक्यता आहे,” असं मिटकरींनी म्हटलं आहे.