राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याबरोबर आज (रविवार) झालेल्या बैठकीनंतर आमदार दीपक केसरकर यांनी आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. आज सिंधुदुर्गात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण संयुक्त सभा घेण्यापूर्वीच दीपक केसरकरांनी राजीनामा दिल्याने राष्ट्रवादीत खळबळ माजली आहे. तसेच, नारायण राणेंसोबत सुरू असलेला वाद उफाळून आला आहे.
दहशतवादविरोधात व जिल्ह्यातील शांततेसाठी मी आमदारकीचा राजीनामा दिला असून आज मी आघाडीच्या मंचावर गेलो असतो तर जनतेमध्ये चुकीचा संदेश गेला असता असे केसरकर यांनी राजीनाम्यानंतर सांगितले. मला शरद पवारांविषयी आदर असून माझ्यामुळे राष्ट्रवादीला कोणाची बोलणी ऐकावी लागू नये यासाठी मी राजीनामा दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
संग्रहित लेख, दिनांक 13th Apr 2014 रोजी प्रकाशित
राष्ट्रवादीचे आमदार दीपक केसरकर यांचा राजीनामा
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याबरोबर आज (रविवार) झालेल्या बैठकीनंतर आमदार दीपक केसरकर यांनी आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला.
First published on: 13-04-2014 at 01:38 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp mla deepak kesarkar resigned