‘हर हर महादेव’ चित्रपटाचा शो बंद करताना ठाण्यातील एका मॉलमध्ये झालेल्या राड्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर ७२ तासांतच जितेंद्र आव्हाडांवर एका महिलेने विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. अशातच आता जितेंद्र आव्हाडांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. कोणत्याही परिस्थितील मला अटक होईल, असं विधान जितेंद्र आव्हाडांनी केलं आहे. त्यांच्या वक्तव्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, “केंद्रातील ज्येष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, कोणत्याही परिस्थितीत मला अटक करण्यात येईल. ठाणे महापालिका निवडणूक होईपर्यंत अथवा त्यानंतर काही महिने जेलमध्ये ठेवण्यात येणार आहे. माझ्याविरोधात एकही गुन्हा दाखल नाही. पण, ही बातमी मिळते तेव्हा आश्चर्य वाटतं,” असं जितेंद्र आव्हाडांनी म्हटलं.

हेही वाचा : “‘अमृत काळ’चे वेष्टण लावून…”, अर्थसंकल्पावरून अजित पवारांचं मोदी सरकारवर टीकास्त्र!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“राज्यावर सध्या सहा लाख ६६ हजार कोटी रुपयांचं कर्ज आहे. ते दर दिवशी वाढत आहे. अशाच पद्धतीने राज्य चालले, तर महाराष्ट्र दिवाळीखोर होईल. केंद्र सरकारने जे मोफत धान्य आणि मोफत रेशन दिलं आहे. पण, मोफत देऊ काही होत नाही. तुम्ही त्या हातांना काम द्या. जे काम त्यांना रेशन घरात घेऊन जाऊ शकते. मोफत देता तो पैसा तुम्ही घरून आणता का,” असा सवाल जितेंद्र आव्हाडांनी केंद्र सरकारला विचारला आहे.