मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी केली आहे. जरांगेंच्या या मागणीनंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. ओबीसी नेते आणि अन्न तथा नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी जरांगेंच्या मागणीला विरोध केला आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये. त्यांना वेगळं आरक्षण द्यावं, अशी भूमिका भुजबळांनी घेतली. यानंतर भुजबळ आणि जरांगे यांच्यात वादाला सुरुवात झाली आहे.

या वादावर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत भाष्य केलं आहे. मनोज जरांगे पाटील हे राजकीय कार्यकर्ते आहेत. पण छगन भुजबळ प्रगल्भ राजकीय नेते आहेत. त्यांच्या तोंडून शब्दांचा अंगार बाहेर पडावा, ही त्यांच्याकडून अपेक्षा नाही, असं विधान आव्हाड यांनी केलं.

Chhagan Bhujbal On Pankaja Munde
पंकजा मुंडेंच्या नाशिकबाबतच्या विधानावरुन छगन भुजबळांचा सल्ला; म्हणाले, “बीडकडे लक्ष द्या..”
jitendra awad challenge to ajit pawar
“अजित पवारांच्या डोक्यातलं विष बाहेर आलं”, ‘द्रौपदी’वरच्या विधानावरुन जितेंद्र आव्हाडांची टीका
sanjay raut narendra modi
“रोज नवे जोक, देशात जॉनी लीवरनंतर…”, मेरठच्या सभेतील मोदींच्या ‘त्या’ वक्तव्यावरून संजय राऊतांचा टोला
controversy over bjp candidate from north mumbai piyush goyal statement on rehabilitation of slum on salt pan lands
झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनावरून वादंग; गरीब हटाव हेच भाजपचे धोरण -विरोधकांची टीका, त्याच ठिकाणी घर देण्यासाठी कटिबद्ध -गोयल यांचे प्रत्युत्तर

हेही वाचा- “२४ डिसेंबरला माझ्यावर हल्ला करण्याची तयारी सुरु, माझं घरही जाळलं तर..”, भुजबळांचा जरांगेंवर आरोप

जरांगे-भुजबळ वादावर भाष्य करताना जितेंद्र आव्हाड विधानसभेत म्हणाले, “मराठ्यांचं नेतृत्व करणारे मनोज जरांगे हे राजकीय कार्यकर्ते आहेत. ते एक सामान्य कार्यकर्ते आहेत. त्यांच्या समजूतदारपणाबद्दल आणि शब्दांबद्दल मला कधी काही वाटत नाही. कारण ते सामाजिक कार्यकर्ते आहेत. असा माणूस बेदरकार असतो. त्यांना अनुभव नाहीये. पण दुसरीकडून जे (छगन भुजबळ) बोलतायत ते प्रगल्भ राजकीय नेते आहेत. त्यांना महाराष्ट्रातल्या सामाजिक परिस्थितीची जाणीव आहे. गेली अनेक वर्षे त्यांनी ओबीसीचं नेतृत्व केलंय. त्यांना आजही आम्ही आमचे नेते मानतो. पण त्यांच्या तोंडून शब्दांचा अंगार बाहेर पडावा, ही त्यांच्याकडून अपेक्षा नाहीये.”

हेही वाचा- “तुमच्यावर अन्याय झालेला नसताना…”, शहाजीबापू पाटलांचा छगन भुजबळांना टोला; म्हणाले, “जरांगेंविरोधात युद्ध…”

“छगन भुजबळ हे कॅबिनेट मंत्री आहेत. कॅबिनेट ही अतिमहत्त्वाची बैठक असते. त्यात तुम्ही तुमचे मुद्दे जोरकसपणे मांडायचे असतात. पण आपण काय करत आहोत. तर शांत आणि स्थिर महाराष्ट्र आपण अशांत करतोय,” अशी टीका आव्हाडांनी केली.