राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार हे अजित पवार गटावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. सोशल मीडियावर कमालीचे सक्रिय असलेले रोहित पवार हे आपल्या लक्षवेधी पोस्टनी विरोधकांवर शरसंधान साधत असतात. आज त्यांनी आपल्या एक्स अकाऊंटवर एक व्हायरल व्हिडिओ शेअर केला. ज्यामध्ये त्यांनी आपल्या मतदानाची किंमत अधिक असून स्वतःला विकणाऱ्या नेत्यांना मत देऊन त्याची किंमत घालवू नये, असे आवाहन केले आहे. “आज काही कथित थोरांमुळं लोकशाहीवर आलेलं संकट परतवून लावण्यासाठी या चिमुकल्या पोरांनी बनवलेला व्हाटसॲपवर आलेला हा व्हिडिओ प्रत्येकाने बघावा”, असे आवाहनही रोहित पवार यांनी केले आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये कोणता संदेश आहे?

रोहित पवार यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये लहान मुलं आपल्या हातात फलक घेऊन जाताना दिसत आहेत. या फलकावर लिहिलेला मजकूर आपले लक्ष वेधून घेतो. व्हिडिओच्या सुरुवातीला पहिलाच फलक येतो, ज्यात लिहिले आहे आजचा बाजारभाव, दुसऱ्या फलकापासून पाळीव जनावरांचा भाव दाखवला जातो. म्हैस ८० हजार, बैल ५० हजार, शेळी १० हजार, कुत्रा ५ हजार आणि निवडणुकीत स्वतःला विकणाऱ्या माणसाची किंमत ५०० ते १००० रुपये फक्त.. पुढे फलक येते, ते अधिक महत्त्वाचे आहे. यावर लिहिले आहे, “स्वतःला विकणाऱ्याला सांगा. तुझ्यापेक्षा कुत्रं महाग आहे. स्वाभिमानाने मतदान करा.”

Parth Pawar, Rohit Pawar, Ajit Pawar,
भाऊ पार्थ पवारच्या पराभवाचा बदला घेणार – रोहित पवार; अजित पवार यांना लगावला टोला
MP Omraje Nimbalkar On Malhar Patil
“तुमच्या रक्तात राष्ट्रवादी, हृदयामध्ये भाजपा आहे, आता किडनीमध्ये…”; ओमराजे निंबाळकर यांचा मल्हार पाटलांना टोला
Sharad Pawar Answer to Ajit Pawar
शरद पवारांचं अजित पवारांना उत्तर, “घरातील लेक ही वंशाचाच नव्हे तर विचारांचाही दिवा तेवत ठेवू शकते, कारण..”
aditya thakceray on shinde group candidate change
“ज्यांनी दिली साथ, त्यांचा केला घात; हेच शिंदे गटाचं ब्रीदवाक्य”, उमेदवार बदलण्यावरून आदित्य ठाकरेंची टीका; म्हणाले…

‘अजित पवारांनी पक्ष चोरला’, या आरोपावर पहिल्यांदाच सुनेत्रा पवारांचं उत्तर, “लोकशाहीत…”

मलिदा गँगचही मतपरिवर्तन होईल

रोहित पवारांनी या व्हिडिओच्या माध्यमातून मलिदा गँगला सूचक इशारा दिला आहे. आपल्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले, “आज सामान्य लोकांचं मतपरिवर्तन झालंच आहे. पण मलिदा गँगचही होईल ही अपेक्षा!” राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर रोहित पवार सातत्याने विरोधकांना मलिदा गँग हा शब्द वापरत आहेत. सत्तेत सहभागी झालेल्यांना मलिदा मिळाला आणि आम्हाला ईडीची नोटीस अशी टीकाही त्यांनी मागे केली होती.

“… तर एकनाथ शिंदे कडक भूमिका घेतील”, शिंदे गटाकडून विजय शिवतारेंना थेट इशारा

हातात चाराणे टेकवल्याप्रमाणे चार तिकिटे

रोहित पवार यांनी आणखी एक ट्विट करत महायुतीवर आणि विशेष करून अजित पवार गटावर निशाणा साधला आहे. मविआ प्रमाणेच महायुतीचे जागावाटप गेल्या काही दिवसांपासून रखडले आहे. अजित पवार गटाला शिंदे गटाऐवढ्याच जागा मिळाव्यात यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. यावरून रोहित पवार यांनी अजित पवार गटावर खोचक टीका केली आहे.

रोहित पवार यांनी लिहिले, “एरवी रुबाबदारपणे तिकीटे वाटणाऱ्या हातांना आज तिकिटांसाठी हात पुढे करावे लागत असतील आणि तेही हातात चाराणे टेकवल्याप्रमाणे चार तिकीटे पडत असतील तर त्या रुबाबदार हातांना मानणाऱ्यांचाही हा अवमान आहे. एकेकाळचा त्यांचा चाहता आणि कार्यकर्ता म्हणून दुःख या गोष्टीचं वाटतं की, एक मोठा नेता महाशक्तीकडून हळूहळू संपवला जातोय.
आज लोकसभेला मॅनेज करतील आणि उद्या विधानसभेला पूर्णपणे डॅमेज करतील…”