scorecardresearch

VIDEO: “शरद पवारांवर टीका करणारा पुन्हा कधीच निवडून आलेला नाही”, शशिकांत शिंदेंचा शहाजीबापूंना थेट इशारा, म्हणाले…

साताऱ्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी शहाजीबापू पाटलांना थेट इशारा दिला आहे.

VIDEO: “शरद पवारांवर टीका करणारा पुन्हा कधीच निवडून आलेला नाही”, शशिकांत शिंदेंचा शहाजीबापूंना थेट इशारा, म्हणाले…
शशिकांत शिंद, शहाजीबापू पाटील व शरद पवार (लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

शिवसेनेच्या बंडखोर शिंदे गटातील आमदार शहाजीबापू पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली. यानंतर आता साताऱ्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी शहाजीबापू पाटलांना थेट इशारा दिला आहे. “शहाजीबापूंनी शुद्धीत राहून शरद पवारांच्या विरोधात वक्तव्य करावीत. कारण शरद पवारांवर टीका करणारा पुन्हा निवडणुकीत निवडून येत नाही,” असं शशिकांत शिंदेंनी म्हटलं. ते गुरुवारी (२२ डिसेंबर) साताऱ्यात माध्यमांशी बोलत होते.

शशिकांत शिंदे म्हणाले, “शहाजीबापू बोलताना शुद्धित होते की कसे होते ते विचारायला हवं. शहाजीबापू निवडणुकीत उभे राहिले तेव्हा शरद पवारांचाच आधार मागत होते. त्यांनी शरद पवारांवर टीका करू नये. जेवढे लोक शरद पवारांवर बोलले ते निवडून आले नाही.”

व्हिडीओ पाहा :

हेही वाचा : “…तेव्हा आम्ही शरद पवारांच्या शिव्या खाल्ल्या होत्या”, जितेंद्र आव्हाडांनी सांगितली ‘ती’ घटना

“आता शहाजीबापू पुन्हा निवडून येतील का हे एकदा त्यांना विचारा,” असं म्हणत शशिकांत शिंदेंनी शहाजीबापूंना खोचक टोला लगावला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-12-2022 at 13:51 IST

संबंधित बातम्या