सातारा-कोल्हापूर महामार्गावरील दोन टोलनाके बंद
सातारा-पुणे-कोल्हापूर महामार्गावरील टोलवसूली विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आज रविवार आंदोलन केले. सातारा- कोल्हापूर महामार्ग सहा पदरी करण्याचे काम सुरू आहे. परंतु, या मार्गाची अतिशय वाईट अवस्था आहे. प्रवाशांना वाहतूकीच्या अनेक अडचणींना सामोरे जावे लागते आणि त्यात टोलवसूली यावरून गेले काही दिवस नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली होती.
खासगीकरण की सरकारीकरण : शासनातच दुमत
अखेर साताऱ्यातील प्रबळ पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसने जनक्षोभ पाहता टोलवसूली विरोधात आंदोलन छेडले. यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी साताऱयातील आणेवाडी टोलनाका आणि कराड येथील सासवडे टोलनाका बंद पाडला आहे. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून राष्ट्रवादीचे  सातारा जिल्हा अध्यक्ष दिलीप येळगावकर आणि वाहतूक संघटनेचे प्रमुख प्रकाश गवळी यांच्यासह दहा ते पंधरा कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केलीा आहे. सध्याच्या तेथील परिस्थितीनुसार, सातारा-कोल्हापूर महामार्गावरील टोलवसूली चार तास बंद होती. त्यामुळे जवळपास दहा लाखांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. 
यापुढे टोलमध्ये त्रैवार्षिक कपात?