शरद पवार आणि अजित पवार यांच्यात फूट पडली आहे. जुलै २०२३ मध्ये अजित पवार यांनी सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला. परिस्थिती बदलून निर्णय घ्यावा लागतो असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. तसंच भविष्या शरद पवारांसह जाणार का या ज्या चर्चा सुरु असतात त्यावर थेट उत्तर देऊन टाकलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्या वेळची परिस्थिती पाहून निर्णय घ्यावे लागतात

त्या त्या वेळची परिस्थिती पाहून निर्णय घ्यावे लागतात. आपल्या वडिलधाऱ्यांनीही असेच निर्णय घेतले आहेत. हे तुम्ही पाहिलं आहे. नदीचा काठ, रस्त्याची दुरवस्था काय असायची ते मला माहीत आहे. आपल्या वडिलधाऱ्यांनी सगळ्या सहन केल्या. आम्हीही राजकारणात आलो. संस्था चांगल्या प्रकारे चालवण्याचा प्रयत्न आमच्या परिने केला.

मागच्या खेपेला अमोल कोल्हेंना मत द्या हे मीच सांगितलं होतं

मागच्या खेपेला मीच तुम्हाला अमोल कोल्हेंना मतदान करायला हे सांगायला आलो होतो. मी त्यांना दुसऱ्या पक्षातून इथे आणलं, प्रवेश दिला, तिकिट दिलं. दिलीपराव आणि मी सीट निवडून आणायची जबाबदारी घेतली होती. मलाही वाटलं होतं की वक्तृत्व चांगलं आहे, दिसायला राजबिंडा आहे. दोन वर्षांतच म्हणाले राजीनामा द्यायचा. मी कलावंत आहे वगैरे सांगत होते. मी त्यांना म्हटलं तसं करु नका. तर मला म्हणाले मी सेलिब्रिटी आहे. तरीही मी त्यांना म्हणायचो की तुम्ही जाऊ नका. पण राजकारण हा अमोल कोल्हेंचा पिंडच नाही. धर्मेंद्र, गोविंदा, सनी देओल यांनीही निवडणूक लढवली होती. त्यांचा राजकारणाशी काय संबंध? असंही अजित पवार म्हणाले

हे पण वाचा- “बेडकाने छाती फुगवली की त्याला वाटतं आपणं बैल आहोत”, रुपाली चाकणकरांचा अमोल कोल्हेंना टोला

आता ते एका बाजूला आणि आपण एका बाजूला

आता सरळ सरळ फाटी पडली आहे. आपण एका बाजूला ते (शरद पवार) एका बाजूला. त्यामुळे काहीजणं म्हणतात ही एकत्र येतील का रं? या चर्चांनी आमचे निम्मे गार होतील. दबकत बोलतात दादा काही होईल का? मी ही चर्चा करणाऱ्या सगळ्यांना सांगू इच्छितो, हे काही होणार नाही. मित्रांनो मी आपल्याला स्पष्ट सांगतो की आपली वेगळी वाट आहे त्यांची वेगळी वाट आहे. आज ही लोकांच्या मनात शंका आहे. बरेच जण म्हणतात हे परत एकत्र येतील की काय? अरे बाबांनो आता आमच्यात फाटलंय. उगाच मनात काही शंका ठेऊ नका.

.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp will not unite again said ajit pawar in shirur scj
First published on: 04-03-2024 at 14:56 IST