देशातील सत्ताधारी राज्यघटनेला दूर सारून धर्मसंसदेपुढे नतमस्तक होत आहेत. त्यामुळे सामाजिक समतेसाठी पुन्हा नवा संघर्ष करावा लागणार आहे. त्यासाठी कोल्हापुरातून सुरू केलेल्या समता संघर्ष परिषदेचे लोण राज्यभर पोहोचवा, असे आवाहन ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील यांनी केले.
कोल्हापूर येथील कमला कॉलेजमधील व्ही. टी. पाटील सभागृहात आज समता संघर्ष परिषद पार पडली. परिषसेचे उद्घाटक म्हणून पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते गोिवद पानसरे होते.
पाटील म्हणाले, राज्यात काही दिवसांपासून लज्जास्पद घटना घडत आहेत. राज्यघटनेने गोरगरीब व दुर्बलांना जगण्याचा अधिकार दिला आहे. पण हे विसरून काही अपप्रवृत्ती दुर्बलांना अधिक दुर्बल करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे सामाजिक स्वास्थ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे परिवर्तनाच्या चळवळीने पुढाकार घेण्याची गरज आहे. जवखेड दलित हत्याकांडा सारख्या प्रकारानंतर असे प्रकार अन्यत्र घडू शकतात. कोल्हापुरात तर आपण सर्वानी सजग राहिले पाहिजे. आजपर्यंत इतर ठिकाणी घडलेल्या अशा प्रकारांचा कोल्हापूरवर कधीही परिणाम झाला नाही.
ते म्हणाले, एका धर्मावर आधारित राज्य कधीही एकसंघ राहिले नाही, हा आजवरचा इतिहास आहे, पण भारतात असंख्य धर्म असूनही आपण अजूनही एकसंघपणे राहत आहोत. राज्यघटनेने तो एकसंघपणा आपल्याला दिला. महात्मा फुलेंनी धर्ममरतडांना विरोध करून सामाजिक समतेची बिजे या देशात रूजवली होती. आज राजसत्ता व धर्मसत्ता एकत्र येऊन सामाजिक समतेवर घाला घालत आहे. तेव्हा हे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी आपण एकत्र येऊन संघर्ष करून ही समता संघर्ष परिषद राज्यभर पोहोचवा, असे आवाहन केले.
गोिवद पानसरे म्हणाले, सामाजिक समता दुर्बलांसाठी महत्त्वाची आहे. ही परिषद राज्यघटनेच्या उद्देशाप्रमाणे दुर्बलांना सामाजिक समतेत अआणण्यासाठी नेठाने काम करेल. शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचाराची कास धरून समतेवर घाला घालणाऱ्या प्रवृत्तींना रोखणार.
यावेळी धनाजी गुरव, मेघा पानसरे, सुभाष जाधव, अतुल दिघे, हसन देसाई, सीमा पाटील, अशोक जाधव, वसंतराव मुळीक, शिवाजीराव परूळेकर, भीमराव कांबळे, बबनराव रानगे आदींसह कार्यकत्रे उपस्थित होते. सूत्रसंचालन सतीशचंद्र कांबळे यांनी केले. प्रास्ताविक दिलीप पवार यांनी केले. चंद्रकांत यादव यांनी स्वागत केले.
संग्रहित लेख, दिनांक 30th Nov 2014 रोजी प्रकाशित
‘सामाजिक समतेसाठी नवा संघर्ष करावा लागणार’
देशातील सत्ताधारी राज्यघटनेला दूर सारून धर्मसंसदेपुढे नतमस्तक होत आहेत. त्यामुळे सामाजिक समतेसाठी पुन्हा नवा संघर्ष करावा लागणार आहे. त्यासाठी कोल्हापुरातून सुरू केलेल्या समता संघर्ष परिषदेचे लोण राज्यभर पोहोचवा, असे आवाहन ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील यांनी केले.
First published on: 30-11-2014 at 02:10 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Need fight for equalise