काँग्रेस नेते राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली ‘भारत जोडो’ यात्रा सुरु आहे. कन्याकुमारीतून सुरु झालेली यात्रा काश्मीरमध्ये जाऊन थांबणार आहे. सध्या ‘भारत जोडो’ यात्रा पंजाब राज्यातून प्रवास करत आहे. यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधी जनतेच्या समस्या जाणून घेत आहेत. तसेच, राहुल गांधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ( आरएसएस ) आणि भाजपावर हल्लाबोल करताना दिसत आहेत. यावरून आता भाजपाचे आमदार नितेश राणेंनी राहुल गांधींवर टीका केली आहे.

एका सभेला संबोधित करताना नितेश राणे म्हणाले, “राहुल गांधी किंवा काँग्रेसचा एक नेता विकासावर बोलताना दिसत आहे का? ‘भारत जोडो’ यात्रेतील सर्व पत्रकार परिषदेत राहुल गांधी आरएसएस, हिंदू धर्म, साधू-संत, वीर सावकरांवर टीका करतात. राहुल गांधींची दाढी काढून रेशीम बागेत पाठवा. पुढच्या दसरा मेळाव्यात खाकी पॅन्ट घालून पहिल्या रांगेत बसलेले राहुल गांधी दिसतील,” असा टोला नितेश राणेंनी लगावला आहे.

हेही वाचा : अमित देशमुख भाजपात प्रवेश करणार? संभाजी पाटील निलंगेकरांचं मोठं विधान; म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“२०२४ साली पराभूत करून टाकू”

नितेश राणेंनी खासदार अमोल कोल्हे यांचा एकेरी उल्लेख करत घणाघात केला आहे. “तो कुठलातरी अमोल कोल्हे पैसे घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करतो. त्याला सिरियसलसाठी पैसे दिले जातात. तो फक्त नावासाठी निवडून आलेला आहे. त्याला २०२४ साली पराभूत करून टाकू. दाढी काढल्यावर त्याला कोणी ओळखणार पण नाही. तो फक्त सिरियल पुरताच आहे,” असं नितेश राणेंनी म्हटलं आहे.