शिवसेनेच्या ठाकरे गटातले १२ ते १३ आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असल्याची शक्यता उद्योग मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केली आहे. यावर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे बाळापूरचे आमदार नितीन देशमुख म्हणाले, त्यांच्या गटातले २४ आमदार काहीतरी गडबड करतील या भितीने ते लोक असला अपप्रचार करत आहेत. ठाकरे गटाचा एकही आमदार त्यांच्या संपर्कात नाही.

आमदार देशमुख म्हणाले की, सुप्रीम कोर्टाचा निकाल आल्यावर शिंदे गटातले १६ आमदार अपात्र होऊ शकतात. तसेच ते जर ६ वर्षांसाठी अपात्र झाले तर या लोकांना विधानसभेच्या दोन निवडणुका लढता येणार नाहीत. म्हणजेच ही मंडळी १० वर्ष घरी बसतील. कुठलीही निवडणूक लढू शकणार नाहीत. त्यावेळी उरलेल्या २४ आमदारांची मजा येईल. ठाकरे गटात जे आमदार आहेत त्यापैकी एकही आमदार त्यांच्या संपर्कात नाही. परंतु आपल्या २४ आमदारांनी काही गडबड केली नाही पाहिजे म्हणून हा अपप्रचार त्यांच्याकडून सुरू आहे.

हे ही वाचा >> अमोल कोल्हेंसाठी जयंत पाटील आदर्श मुख्यमंत्री, मग अजित पवारांबाबत भूमिका काय? ‘त्या’ विधानावर दिलं स्पष्टीकरण!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, शिंदे गटातले आमदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात आहेत का असा प्रश्न विचारल्यानंतर देशमुख म्हणाले की, ते संपर्कात आहेत की नाही, याबद्दल मला माहिती नाही. परंतु ते नाराज आहेत हे त्यांनी अनेकदा भेटींदरम्यान सांगितलं आहे. आमचं नुकसान झालं, पुढे आमचं भवितव्य काही नाही अशी चर्चा ते खासगीत करतात. यांच्यापैकी कुणी परत शिवसेनेत (ठाकरे गट) आलं तर त्यांना पक्षात स्थान दिल जाऊ नये. देशमुख एबीपी माझाशी बोलत होते.