राज्यात दहा महानगरपालिकांसाठी मतदान सुरू आहे. मात्र अनेक ठिकाणी निवडणूक आयोगाच्या आदेशांचे उल्लंघन होताना दिसते आहे. निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची संपत्ती आणि गुन्हेविषयक पार्श्वभूमीची माहिती देणारा फलक लावण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने केल्या होत्या. मात्र नागपूरसह अनेक भागांमध्ये मतदान केंद्रांवर फलक लावण्यात आलेले नाहीत. विशेष म्हणजे ज्या भागात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले उमेदवार निवडणुकीला उभे आहेत, त्याच भागातील मतदान केंद्रांवर फलक लावले न गेलेले नाहीत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी मतदान केंद्रावर फलकांच्या माध्यमातून लावण्यात यावी. त्यामुळे मतदाराला लोकप्रतिनिधी निवडताना मदत होईल, अशी सूचना निवडणूक आयोगाकडून करण्यात आली होती. नागपूरमध्ये मात्र या सूचनेला फाटा देण्यात आला आहे. शिवसेना उमेदवार आणि कुख्यात गुंड अनिल धावडे निवडणूक लढवत असलेल्या भागातील ७ मतदान केंद्रांवर कोणतेही फलक लावण्यात आलेले नाहीत. अनिल धावडे शिवसेनेच्या तिकिटावर प्रभाग क्रमांक २२ ड मधून निवडणूक लढवत आहे. धावडेवर २२ गुन्हे दाखल आहेत. मात्र अनिल धावडे राहात असलेल्या भागातील सात मतदान केंद्रांवर गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती देणारे कोणतेही फलक लावण्यात आलेले नाहीत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No information at voting booth about criminal records of candidates nagpur election
First published on: 21-02-2017 at 13:25 IST