राष्ट्रवादीचे माजी मंत्री राणा जगजितसिंह पाटील यांच्याविरोधात शिवसेना आमदार ओम राजेिनबाळकर यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत उस्मानाबाद मतदारसंघातून, तर पालकमंत्री मधुकर चव्हाण यांनी शिवसेना, भाजप व राष्ट्रवादीच्या उमेदवाराला आव्हान देत तुळजापूर मतदारसंघात शुक्रवारी उमेदवारी दाखल केली.
आमदार राजेिनबाळकर यांनी ग्रामदैवत धारासूर मर्दिनी, हजरत ख्वॉजा शमशोद्दीन गाजी यांचे दर्शन घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजीमहाराज पुतळ्यांना पुष्पहार घालून अर्ज दाखल केला. दुपारी शिवसैनिकांच्या मेळाव्यात तेरणा कारखाना व जिल्हा बँकेच्या मुद्यांवर त्यांनी भाष्य केले. तेरणा सुरळीत चालू नये, म्हणून राष्ट्रवादी व काँग्रेसच्या बँकेतील सत्ताधाऱ्यांनी कारखान्यास कर्ज न देता पूर्वीचेच कर्ज कसे वसूल होईल, हे पाहिले. आपल्या ताब्यात आला, तेव्हा कारखान्यावर बँकेचे ४३८ कोटींचे कर्ज होते. आपण निम्मे कर्ज फेडले. कर्ज कमी झाल्यानंतर कारखान्यावर नजर ठेवून बिनबुडाचे आरोप करणाऱ्यांना या निवडणुकीत धडा शिकवायचा आहे, असे ते म्हणाले. माजी आमदार दयानंद गायकवाड, धाराशिव कारखान्याचे अध्यक्ष सुरेश पाटील उपस्थित होते.
पालकमंत्री चव्हाण यांनी तुळजापूर शहरात मोठी पदयात्रा काढली. तत्पूर्वी तुळजाभवानी दर्शन घेतले. नंतर हडको मदानावर आयोजित सभेत चव्हाण यांनी, जिल्हयात काँग्रेस अधिक मजबुत करण्यास जातीने लक्ष घालणार आहोत. शेलारमामाप्रमाणे िखड लढवण्याचा निर्धार जनतेच्या सहकार्याशिवाय पूर्ण होणार नाही, असे सांगून पसे वाटून निवडणूक लढविणाऱ्या भांडवलदारांना योग्य जागा दाखवा, असे आवाहन केले.
९ मतदारसंघांत १३३ जणांचे २५५ अर्ज
ढोल-ताशाला फाटा देऊन दर्डा, देहाडे, पाटील यांचे अर्ज दाखल
प्रतिनिधी, औरंगाबाद
प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी ढोल-ताशे न लावता गुपचूप अर्ज दाखल करण्यावरच शुक्रवारी भर दिला. पूर्व मतदारसंघातून शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा, पश्चिममधून जितेंद्र देहाडे व मध्य मतदारसंघातून राष्ट्रवादीचे विनोद पाटील यांनी अर्ज दाखल केला. पण ना ढोल ना ताशा.
शुक्रवारी सकाळी देहाडे यांच्यासाठी आयोजित प्रचारफेरीपूर्वी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यास काँग्रेस नेते मुकुल वासनिक उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारभारावर त्यांनी टीका केली. त्यानंतर मिरवणुकीने देहाडे यांनी पश्चिम मतदारसंघात अर्ज दाखल केला. सकाळच्या सत्रात दर्डा यांनी निवडक कार्यकर्त्यांसह अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करताना शक्तिप्रदर्शन केले नाही. या मतदारसंघाचे कार्यालय पश्चिम विधानसभा क्षेत्रात असल्याने त्याचा फारसा उपयोग नसल्याचेही सांगण्यात आले.
मध्यमधील मनसे उमेदवार राजगौरव वानखेडे यांनी शक्तिप्रदर्शनासह अर्ज दाखल केला. मध्य मतदारसंघात शुक्रवारी ९ उमेदवारांनी १७ अर्ज दाखल केले. माजी महापौर रशिदखान हमीदखान पठाण यांच्यासह संजय जगताप, भीमराव प्रल्हाद सोनवणे, खान मेहरुनिसा हमीद, फारुखी मोईनोद्दीन, सय्यद मुशीरोद्दीन हुसेन, मुकेश सुखबीर लाहोट यांच्यासह राष्ट्रवादीचे विनोद पाटील यांनी अर्ज दाखल केले.
मध्य विधानसभा क्षेत्रात दर्डा यांच्या विरोधात उघड भूमिका घेणारे उत्तमसिंह पवार यांनीही अर्ज दाखल केला. पद्माकर मुळे यांची या वेळी उपस्थिती होती. पवार यांनी नुकताच काँग्रेसचा राजिनामा दिला. पूर्व मतदारसंघात सुमित अवचरमल, पुष्पा जाधव, जवाहरलाल भबुरे, शेख जियालाल अकबर पटेल, उद्धव गोवर्धन बनसोडे यांनी अर्ज दाखल केले. गंगापूर, वैजापूर मतदारसंघांत प्रत्येकी १० उमेदवारांनी अर्ज दाखल केले. ९ मतदारसंघांत १३३जणांनी २९५ अर्ज दाखल केले.
परभणीतील ४ मतदारसंघांत ७२ उमेदवारांचे अर्ज दाखल
वार्ताहर, परभणी
जिल्ह्यातील गंगाखेड, परभणी, पाथरी व जिंतूर या ४ मतदारसंघांतून ७२ उमेदवारांनी शुक्रवापर्यंत अर्ज भरले.
जिंतूरमध्ये १५, परभणी २५, गंगाखेड १९ व पाथरीत १३ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले. जिंतूरमधून काँग्रेसचे आमदार रामप्रसाद बोर्डीकर, राष्ट्रवादीचे विजय भांबळे, शिवसेनेचे राम पाटील, भाकपचे कॉ. राजन क्षीरसागर, पाथरीत शिवसेनेच्या मीरा रेंगे, मनसेचे हरिभाऊ लहाने, अपक्ष सुरेश वरपुडकर व मोहन फड, गंगाखेडमधून आमदार सीताराम घनदाट, शेकापच्या चित्राताई दुधाटे, भाजपचे विठ्ठल रबदडे व डॉ. सुभाष कदम, मनसेचे बालाजी देसाई, परभणीत सेनेचे डॉ. राहुल पाटील व अपक्ष आनंद भरोसे या दिग्गजांचे अर्ज दाखल झाले. राष्ट्रवादीकडून प्रताप देशमुख उद्या अर्ज भरणार आहेत.
५ मतदारसंघांत ५९ अर्ज
खोतकर, टोपे, जेथलिया, दानवे यांचे अर्ज दाखल
वार्ताहर, जालना
जालना मतदारसंघातून शिवसेनेचे अर्जुन खोतकर यांनी अर्ज दाखल केला. सेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, सुनील किनगावकर, अनिरुद्ध खोतकर, पक्षाचे शहरप्रमुख विष्णू पाचफुले व बाला परदेशी आदी उपस्थित होते. जिल्ह्य़ातील ५ मतदारसंघात शुक्रवारी एकूण ५९ अर्ज दाखल झाले. परतूर १५, घनसावंगी ६, जालना ९, बदनापूर १८ व भोकरदन ११ याप्रमाणे अर्ज दाखल झाले.
शेख चांदपाशा शेख जानी, दादाराव लहाने (अपक्ष), राजेंद्र खरात (भारिप-बहुजन महासंघ), खालेदबिन नासेर चाऊस (भारिप-बहुजन महासंघ), अब्दुल रशीद अजीज (बहुजन समाज पक्ष) यांनीही जालना मतदारसंघात अर्ज दाखल केले. कैलास गोरंटय़ाल यांनी काँग्रेसच्या वतीने शुक्रवारीही अर्ज दाखल केला. गुरुवारीही त्यांनी अर्ज भरला होता. घनसावंगी मतदारसंघात राष्ट्रवादीचे राजेश टोपे यांनी अर्ज भरला. बदनापूरमधून राष्ट्रवादीकडून बबलू चौधरी, भोकरदनमधून चंद्रकांत दानवे यांनी अर्ज भरला. परतूरमधून आमदार सुरेश जेथलिया यांनी काँग्रेसच्या वतीने अर्ज दाखल केला. काँग्रेस जिल्हाध्यक्ष भीमराव डोंगरे, जालना शहराध्यक्ष अब्दुल हफीज आदींची उपस्थिती होती. भोकरदनला श्रीरंग जंजाळ (अपक्ष), संतोष दानवे (भाजप), हरिभाऊ रत्नपारखे (बसपा) आदी ११जणांनी अर्ज दाखल केले. परतूरला बाबासाहेब आकात (मनसे), बबन लोणीकर (भाजप) यांचे अर्ज दाखल झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nomination form submit
First published on: 27-09-2014 at 01:54 IST